उमराणे : शेतकºयांचे पैसे अदा झाल्याशिवाय बाजार समितीचे कामकाज चालू देणार नाही असे सांगत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत धनादेश प्रकरणी फसवणूक झालेले शेतकरी बांधव, व्यापारी, संचालक मंडळ व अधिकाºयांची संयुक्त बैठक येत्या आठवड्यात घेणार असल्याची माहिती संचालक प्रशांत देवरे यांनी दिली.संपर्क साधण्याच्या आवाहनानुसार १७५ शेतकºयांनी माल विक्रीची पावती, धनादेश, धनादेश बाउन्स पावती यांच्या छायांकित प्रती जमा केल्यात. अद्यापही ३६ व्यापाºयांकडे सुमारे ८५ लाख रक्कम थकीत आहे. बाजार समितीची मार्च अखेर व्यापाºयांकडे १० कोटी २५ लाख रक्कम फी थकीत आहे. परवाना नूतणीकरण करताना वसुलीसाठी प्रशासन गांभीर्याने पावले उचलत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. उमराणे बाजार समितीत शेतकºयांना कांदा विक्र ीचे पैसे धनादेशद्वारे देण्यात येत आहेत. बहुतांश व्यापाºयांकडील धनादेश बाउन्स होत असल्याने लाखो रुपये अडकले आहेत. याबाबत संचालक प्रशांत देवरे यांनी बाजार समितीतील धनादेश बाउन्स, मार्केट फी, विकासकामे, व्यापारी परवाने आदींबाबत जिल्हा उपनिबंधक व बाजार समितीकडे लेखी तक्र ार केली होती. त्याची चौकशी सुरू आहे. संचालक मंडळात मी एकमेव विरोधी संचालक आहे. राजकारण करायला अन्य ठिकाणी खूप संधी आहे. शेतकरी संकटात आहे. त्यांचे पैसे मिळवून देण्याची जबाबदारी आहे.व्यापारी रोख पैसे देण्याच्या तयारीत असताना ठरावीक व्यापाºयांचे हितसंबंध जपण्यासाठीच प्रशासन व व्यापारी असोसिएशन रोख पैसे देण्याचे लांबणीवर टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा आहे. १ जानेवारी, मार्च, मेपासून रोखीने व्यवहार सुरू करू, असे तारीख पे तारीख वायदे प्रशासनाने केले आहेत. आता १ जूनपासून रोख व्यवहार सुरू झाले तर आनंदच होईल.- प्रशांत देवरे,संचालक, बाजार समिती, उमराणे
‘आधी शेतकऱ्यांचे पैसे, नंतरच समिती कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 1:18 AM
’उमराणे : शेतकºयांचे पैसे अदा झाल्याशिवाय बाजार समितीचे कामकाज चालू देणार नाही असे सांगत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत धनादेश प्रकरणी फसवणूक झालेले शेतकरी बांधव, व्यापारी, संचालक मंडळ व अधिकाºयांची संयुक्त बैठक येत्या आठवड्यात घेणार असल्याची माहिती संचालक प्रशांत देवरे यांनी दिली.
ठळक मुद्दे शेतकरी बांधव, व्यापारी, संचालक मंडळ व अधिकाºयांची संयुक्त बैठक येत्या आठवड्यात घेशेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा