इगतपुरीच्या पूर्व भागातील टाकेद ते खेडदरम्यान कडवा नदीवर अपर कडवा धरण मंजूर आहे. परंतु सदर धरणाला स्थानिक आदिवासी शेतकºयांचा तीव्र विरोध आहे. या भागातील शेतकरी पूर्णत: शेतीवर अवलंबून आहेत. धरणात त्यांच्या जमिनी गेल्या तर त्यांच्याकडे अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. सदर शेतकरी धरणासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीमुळे भूमिहीन होणार आहेत. या धरण क्षेत्रातील सर्व गावे हे पेसांतर्गत येत असल्यामुळे या भागातील आदिवासी शेतकºयांचा धरणाला विरोध आहे, असे निवेदनात म्हटले आहे. बाळू गायकवाड ,विष्णू घोरपडे, उपसरपंच पोपट लहामगे, शंकर चोथवे, शांताराम लहामगे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. यावेळी तुकाराम लहामगे, कोंडाजी कालेकर, एकनाथ लहामगे ,सरपंच अशोक बोराडे ,नामदेव लहामगे, ज्ञानेश्वर चोथवे, लक्ष्मण जाधव, शंकर बर्हे आदी शेतकरी उपस्थित होते.