पंचवटी : स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद शिवारात नियोजित हरित क्षेत्र विकास योजना राबवण्यासाठी महासभेवर ठेवलेला प्रस्ताव रद्द करण्यात यावा, असा ठराव मखमलाबाद येथील शेतकºयांच्या बैठकीत करण्यात येऊन ग्रामस्थांनी विरोध कायम दर्शविला आहे. ठराव रद्द करण्यासंदर्भात महापौर रंजना भानसी यांच्याकडे मागणी करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. दरम्यान, प्रस्ताव रद्द झाल्यानंतर करण्यात येणाºया सर्वेक्षणानंतरच शेतकºयाचे हित लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही बैठकीत ठरविण्यात आले.स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथील नियोजित हरित क्षेत्र विकास सर्वेक्षणास शेतकºयांनी विरोध दर्शवून काम हाणून पाडले होते. या विषयावर चर्चा करण्यासाठी रविवारी शेतकºयांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत स्मार्ट सिटी अंतर्गत साडेसातशे एकर क्षेत्रावर राबविण्यात येणाºया प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात येऊन प्रकल्प राबविल्यास त्याचा शेतकºयांना काय फायदा तसेच तोटा होईल, याबाबत मते-मतांतरे मांडण्यात आली. अंतिम प्रस्ताव प्रशासन सादर करेल त्यानंतरच या प्रकल्पाला मान्यता द्यावी किंवा नाही याबाबत शेतकरी निर्णय घेणार आहेत, असा सूर हनुमानवाडीतील धनदाई लॉन्स येथे रविवारी (दि.२०) झालेल्या शेतकºयांच्या बैठकीत निघाला.जमिनी दिलेल्या शेतकºयांना ५० टक्के जमिनी परत मिळणार असल्या तरी कर भरावा लागणार आहे. नाशिक शहराचा विकास झालेला नव्हता त्यावेळी अशा प्रकारच्या योजना राबविण्यास हरकत नव्हती मात्र आता नाशिकचा विकास झाला आहे. शहराच्या मध्यवस्तीत प्रकल्प राबविला जाणार असला तरी तो अयोग्य आहे.७०० एकरांमध्ये स्मार्टनगरचे नियोजनस्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या वतीने मखलबाद-नाशिक शिवारात एकूण सातशे एकरमध्ये नियोजनबद्ध स्मार्टनगर वसविण्यात येणार आहे. त्यासाठी नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविली जाणार आहे. या प्रस्तावाला मुळातच परिसरातील शेतकºयांचा विरोध आहे.स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या वतीने मखमलाबाद नाशिक शिवारात स्मार्टनगर बसविण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी टीपी स्कीम राबविली जाणार असून, त्यास शेतकºयांचा विरोध आहे. मात्र यासंदर्भात शेतकºयांमध्ये असलेल्या मतप्रवाहाचीदेखील चर्चा आहे.
हरित क्षेत्र विकासाला शेतकऱ्यांचा विरोध कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 1:26 AM