दिंडोरी : शासनाने मोबाइलमध्ये ई-पीक नोंदणी ॲप दिशादर्शक असून, शेतकऱ्यांसाठी हे ॲप उपयोगी ठरणार आहे. यात येणाऱ्या अडचणी लवकरच दूर करण्यात येतील. ई-पीक पाहणी प्रकल्पात शेतकऱ्याचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल अव्वर सचिव नितीन करीर यांनी केले.दिंडोरी येथे प्रगतशील शेतकरी बाळासाहेब जाधव यांच्या शेतात करीर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी भेट दिली. त्याप्रसंगी त्यांनी सूचना केल्या. शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांंशी संवाद साधला. यावेळी शासनाच्या ई-पीक पाहणी प्रकल्पात प्रतीक जाधव यांनी ई-पीक पाहणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यांनी शेती क्षेत्रात जाऊन मोबाइलमध्ये द्राक्षशेतीचा फोटो काढला. त्याची माहिती स्किनवर टाकली. सातबारा उताऱ्यावरील नाव, गट क्रमांक, खाते क्रमांक यांची सर्व माहिती कशी भरावी, याचे प्रात्यक्षिक करीर यांना करुन दाखविले. शेतकरी जाधव यांनी शेतीची माहिती देऊन ई-पीक प्रकल्पाबाबत सूचना सांगितल्या. ई-पीक पाहणी नोंदणी प्रकल्प शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असल्याचे ते म्हणाले. यावेळी कृषी सहायक रूपाली लोखंडे, तलाठी अश्विनी बागुल, रोहिणी टाळकुटे यांनी ई-पीक पाहणी प्रकल्पाची इंटरनेटवर नोंद कशी होते याची प्रात्यक्षिक दाखविले.प्रांत संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांनी प्रकल्पातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. यावर लवकरच उपाययोजना केल्या जातील, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. चर्चेत प्रतीक जाधव, डॉ. राहुल जाधव, भगवान जाधव, जयवंत जाधव, किरण जाधव, पप्पू जाधव, संजय जाधव, हेमंत जाधव, आकाश जाधव, सागर बोरस्ते, नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांनी सहभाग घेऊन पिकांबाबत माहिती दिली. त्यानंतर अव्वर सचिवांनी शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. स्वागत प्रांत संदीप आहेर व तहसीलदार पंकज पवार यांनी केले.
ई-पीक पाहणी प्रकल्पात शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 10:52 PM
दिंडोरी : शासनाने मोबाइलमध्ये ई-पीक नोंदणी ॲप दिशादर्शक असून, शेतकऱ्यांसाठी हे ॲप उपयोगी ठरणार आहे. यात येणाऱ्या अडचणी लवकरच दूर करण्यात येतील. ई-पीक पाहणी प्रकल्पात शेतकऱ्याचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल अव्वर सचिव नितीन करीर यांनी केले.
ठळक मुद्देराज्याचे अव्वर सचिव नितीन करार यांचा दिंडोरीत दौऱ्यात सूचना