एकलहरे : हिंगणवेढे परिसरातील शेतकरी टमाटा लागवडीची तयारी करीत असून, शेतकऱ्यांनी पूर्वतयारी म्हणून शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने सºया तयार करून त्यावर मल्चिंग पेपर पसरवून ठेवला आहे.सध्या टमाटाच्या रोपांना चांगली मागणी असून, त्यासाठी नर्सरीमध्ये रोपे तयार केले जात आहेत. काही शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतातच नर्सरी बनवून टमाटा रोपे तयार केली आहेत. यंदा शेतकºयांची हायब्रिड जातीच्या सॅन्जेन्टा, गर्व या टमाटा वाणांना अधिक पसंती आहे. त्याची रोपे साधारणत: २५ ते ३० दिवसांत लागवडी योग्य होतात. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी टमाटा लागवड करतात.सध्या दुष्काळामुळे सर्वत्र पाणीटंचाई असली तरी अनेक शेतकºयांनी स्वत:च्या विहिरी व विंधन विहिरीच्या पाण्यावर टमाटा लागवड करण्याची तयारी केली आहे. टमाटा लागवडीसाठी पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या भागातून मजूर आणून कामे करून घेतली जात आहेत.सध्या उन्हाळ्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. विजेच्या लपंडावामुळे पाणी असूनही पिकांना देता येत नाही. कधी पाणी व वीज असूनही बिबट्याच्या धाकाने शेतकरी रात्री-बेरात्री शेतात पाणी देण्यासाठी जायला घाबरतात. अशा एक ना अनेक अडचणींचा सामना करीत शेतकरी सध्या टमाटा लागवड करीत आहेत. त्यासाठी बाहेरून मजूर आणावे लागत आहेत.- दत्तू कृष्णा धात्रक, शेतकरी
शेतकरी टमाटा लागवडीच्या तयारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 12:50 AM