दरेगाव - चांदवड तालुक्यातील पूर्व भाग हा खरिपातील आगाद पोळ कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो.दरवर्षी जुलै महिन्यात या भागात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. या वर्षी मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पावसाने ओढ दिेल्याने भर पावसाळ्यात ही टंचाई निर्माण झाली आहे. अत्यंत कमी पाण्यात शेतकऱ्यांनी कांदा उळे टाकून रोपे तयार करून ठेवली आहे, मात्र लागवडीसाठी पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. याआधीच खरिपातील अन्य पिके पाऊसाअभावी सुकलेली असून उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.तो आर्थिक फटका बसला असतांनाच आता येथील उत्पन्नांचा प्रमुख स्त्रोत असणाºया या पिकांचे भवितव्य आता श्रावण महिन्याच्या सरी किती कोसळतात व त्या पुढील काळात होणाºया पावसावर अवलंबून राहणार आहे. परिसरात तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊसाच्या भरोशांवर मोजक्या शेतकºयांनी कोरडवाहू कांदा लागवड सुरू केली आहे. थोडा फार जरी पावसाला सुरु वात झाली तरी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवडीस सुरु वात होईल. चांदवड तालुक्यातील पुर्व भागात दरेगाव,निमोण, वाद,वराडी, डोणगाव, शिंगवे, मेसनखेडे ,कानडगाव, कुंदलगाव, दहेगाव, दुगाव, रायपूर, भडाणे,वागदडी व यांच्या आसपासच्या गावात या पावसाळयात दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरी समाधानकारक पाणी न पडल्यांने खरिपाच्या बाजरी, मका,भुईमूग, मूग , टोमॅटो, मिरची व अन्य भाजीपाला या पिकांना फटका बसला. पिके सुकेल्याने व फुलोर्यात झटका बसून अपेक्षीत उत्पादन न होता त्यात घट येणार आहे. या परिसरात दरवर्षी जिल्ह्यात सुरूवातीला लवकरच कांदा लागवड करतात.या वेळी पाणीच नसल्याने लागवड उशिरा होणार आहे,मात्र त्या करिता ही पुढे होणार्या पावसावर गणति अवलंबून राहणार आहेच. परिसरात अदयाप विहीरींना पाणी नाही. नदी, नाले, बंधारे, शेततळे, कुपनलिका कोरड्याठाक आहेत. काही शेतकºयांना आपल्याकडे साठवणूक केलेल्या पाण्यावर तर काहींनी निसर्गभरोसे रोपे जगविली.पंचेचाळीस दिवसांपूर्वी टाकलेली रोपे लागवड योग्य तयार झाली आहे .काहींना थोडे सुद्धा पाणी नसल्याने ती जळाली. आज न उद्या पाऊस येईल या आशेने शेतकº्यांनी कांदा लागवडीसाठी शेत मशागत करून पाळे पाडून वाफे तयार करून ठेवली आहे. श्रावणात रिमझिम पाहळे स्वरूपांत जरी पाऊस पडत राहिला तरी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड कोरडवाहू स्वरु पात होईल आण ित्यानंतर शेतकºयांचे डोळे परतीच्या पावसावर राहतील.
शेतकरी कांदा लागवडीसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 5:59 PM