खडकी : कांदा बियाणे तीस हजार रुपये पायली झाल्याने शेतकऱ्यांमध्ये कांदा लागवडीसाठी संकट निर्माण झाले आहे. घरगुती बियाणी उपलब्ध नसल्याने लांब दूरवरून पाणी शोधण्यासाठी शेतकºयांना हेलपाटे घालावे लागत आहे
गतवर्षी कांद्याला दहा ते वीस हजारांचा भाव मिळाल्याने कांद्याचे रोप तयार करण्यासाठी कांदा उपलब्ध नव्हता यामुळे कांद्याचे बियाणे तयार झाले नाही यावर्षी उन्हाळ कांद्याच्या बियाण्याने मोठी झेप घेतल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आधीच लाल कांद्याला जास्त पावसामुळे चांगले दिवस नसल्याने कांदा लागवड भिजत पडले आहे, लागवड झाली आहे त्यावर बुरशी आल्याने मूळ खराब होऊन कांद्याचे उत्पादन घटणार आहे. आज शेतकºयांना कांद्याचे भाव वाढण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. जास्त शेतकºयांनी आपला मोर्चा कांदा लागवडीकडे वळवला आहे. कांदा लागवड करण्यासाठी उपलब्ध असलेली रोपे शोधण्यासाठी पूर्ण कुटुंब कामाला लागले आहे. कांदा लागवडीमधून व कांद्याच्या उत्पादनामधून शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न दिले जाते. त्यामुळे शेतकºयांनी दरवर्षी कांदा उत्पादन तोट्यात गेले असले तरी कांद्याची लागवड सुरू ठेवले आहे. कांदा लागवडीसाठी मजूर खर्च मोठा असला तरी शेतकरी त्याची जुळवाजुळव करून कांदालागवड करीत आहे, मात्र चालू वर्षी शेतकºयाला कांदा बियाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनामार्फत अनुदान अभियानामध्ये नसल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे.कांद्याचे बियाणे चार हजार ते सहा हजार रुपये किलोप्रमाणे विकण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत, घरचे बियाणे उपलब्ध नसल्याने विकत घेऊन कांदा लागवड करणे जिकिरीचे आहे. बियाणे उपलब्ध नसल्याने दुसरे उत्पादन घेण्यासाठी जमीन राखून ठेवली आहे, मात्र त्या ठिकाणी शेतकºयांनी कांदालागवड करण्याचे ठरवल्याने उपलब्ध रोपे नसल्याने शेतकºयाची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. त्यातच बाजरी कापणीचा हंगाम किंवा मका कापणी डोक्यावर आली आहे. त्यासाठी आर्थिक गरज पडणार आहे. त्यातूनही रस्ता काढून शेतकºयांनी कांद्याची रोपे व बियाणी उपलब्ध करण्यासाठी कंबर कसली आहे. कांदा बियाणे कृषी निविष्ठा दुकानांवर उपलब्ध झाले असले तरी त्याची कृत्रिम टंचाई शेतकºयांना फायदेशीर असल्याने याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे, तरच शेतकºयांना कांदा बियाणे उपलब्ध होणार आहे व पुणे कांदा उत्पादनाची शेतकºयांना लागणार आहेत.