नगरसूल : येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात दोन दिवसांपासून दाट धुके पडत असल्याने व थंडगार हवेने शेतकरी हवालदिल झाले असून, पिके वाचविण्यासाठी महागडी कीटकनाशक व खते आणून कसरत करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे पिकांसह नागरिकांनाही साथीच्या आजारांनी ग्रासल्याने आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर हरबरा, उन्हाळ कांदे रोपे व भाजीपाला पिकांची धुक्यामुळे पार वाट लागणार असल्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.परतीच्या पावसाने विहिरीत बर्यापैकी पाणी आले. पण पाणी देण्यासाठी विजेचा प्रश्न, कापूस वेचणीला मजुरांची टंचाई, रात्रीच्या वेळी वीज देण्यात येत असल्याने अंधारात पिकांना पाणी द्यावे कसे अशा अनेक अडचणींना सामोरे जात शेतकर्यांनी गहू, हरबरा या मुख्य पिकासोबत भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर केली. हिवाळ्याचे जवळपास तीन महिने होत आले तरी थंडी नसल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. त्यातच दोन दिवसांपासून दाट धुके पडत असल्याने सर्वच पिकांना त्याचा फटका बसणार आहे. हिरवी मिरची, वांगे, कांदे, टमाटे, गहू, हरबरा पिकांना कसे वाचवावे याच्या चिंंतेत शेतकरी पडला आहे.संकटांची मालिका सुरूचअतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची शासन मदत अद्यापही पदरात पडली नसताना आता नवीन अस्मानी संकटाची भर पडली असल्याचे येथील शेतकरी नानासाहेब आहेर यांनी सांगितले. तर उशिरा पेरणी झालेला गहू व हरबरा कांदे रोपे या पिकांना धक्याचा थेट परिणाम दिसणार असल्याचे गारखेडा येथील शेतकरी नानासाहेब आहेर यांनी सांगितले. एकूण संकटांची ही मालिका संपण्याचं नावं घ्यायला तयार नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला जाणार की काय याची धास्ती शेतकर्यांनी घेतली आहे.
शेतकरी धुक्यामुळे हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 6:32 PM
येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात दोन दिवसांपासून दाट धुके पडत असल्याने व थंडगार हवेने शेतकरी हवालदिल झाले असून, पिके वाचविण्यासाठी महागडी कीटकनाशक व खते आणून कसरत करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे पिकांसह नागरिकांनाही साथीच्या आजारांनी ग्रासल्याने आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर हरबरा, उन्हाळ कांदे रोपे व भाजीपाला पिकांची धुक्यामुळे पार वाट लागणार असल्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देबदलत्या हमामानामुळे पिके वाचविण्यासाठी कसरत