नाशिक : शेतकयांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे. संशोधन केंद्रांतून अशा प्रकारचे नवीन तंत्रज्ञान शेतकºयांच्या शेतावर पोहोचवण्यासाठी पुढील काळात प्रशिक्षित कृषी विस्तार कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे ‘कृषी विस्तार सेवा प्रदाता’ या तीस दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रा. ई. वायुनंदन म्हणाले, संशोधन केंद्रावरील संशोधन शेतकºयांपर्यंत पोहोचण्यास लागणारा कालावधी कमी करणे आणि कृषी संशोधन जास्तीत जास्त शेतक यांपर्यंत पोहोचणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी गावपातळीवर कृषी शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी चांगले कृषी विस्तार कार्यकर्ते तयार होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. शेतकयांच्या गरजा आणि समस्या ओळखून कार्यक्रमांची आखणी करणे आणि सुयोग्य विस्तारपद्धत वापरून ते राबविण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील यांनी केले. डॉ. नितीन ठोके यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. प्रकाश कदम यांनी आभार मानले.
शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : ई. वायुनंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 1:43 AM