नाशिक - अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना बांधावर मदत दिली पाहिजे, असे मत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज नाशिक येथे व्यक्त केले.आदित्य ठाकरे यांनी आज मोहाडी, ओझर, निफाड यासह विविध ठिकाणी भेटी दिल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जिल्ह्यात मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणा आपल्या परीने पंचनामे करीत आहे परंतु त्यापलिकडे जाऊन आता शेतकऱ्यांना बांधवरच मदत मिळाली पाहिजे असे ते म्हणाले. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान पीक विम्याच्या अनेक निकषात बसत नाही त्यामुळे पीक विम्याच्या निकषात बदल केला पाहिजे असेही ते म्हणाले.2014 मध्ये झालेल्या गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही त्याबाबत अनेक शेतकऱ्यांनी आज तक्रारी केल्याचे सांगून आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात नाशिकच्या विभागीय आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे ठाकरे म्हणाले. यावेळी ग्राम विकास राज्यमंत्री दादा भुसे तसेच शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर मदत दिली पाहिजे - आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 9:06 PM