दाभाडी : परिसरात पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, रब्बी पिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.मृग नक्षत्रात तुरळक पावसाने हजेरी लावली त्या पावसावर शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत करून ठेवली. मृग नक्षत्रा पाठोपाठ येणाऱ्या आर्द्रा नक्षत्रातही पावसाने रिमझिम सुरुवात केली. रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी बाजरी, मका, भुईमुंग, तुर आदि पिकांची पेरणी केली.गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या आठवड्यात व एक- दोन दिवसापासून कोसळणाऱ्या पावसामुळे परिसरातील नदी, नाले वाहत आहे. परिसरातील धरणे, तलाव, पूरपाण्याने भरण्यात आली आहेत. त्यातच अधुन-मधुन कोसळणाऱ्या पावसामुळे खरीप पिके हाती लागण्याची आशा निर्माण झाली आहे. परिसरात पावसाळी कांदा लागवडीस प्रारंभ झाला आहे. पूर पाण्याने धरणे भरली असल्यामुळे रब्बी हंगामाच्या अपेक्षही उंचावल्या आहेत. (वार्ताहर)दरोड्याच्या तयारीतील दोघांना कोठडीनाशिक : हिरावाडी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून, यामध्ये एका विधिसंघर्षित बालकाचा समावेश आहे़ यातील दोघांना न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ संशयित मुस्तफा पापा सय्यद (३२, रा़ फुलेनगर), संदेश सुधाकर पगारे (२२, रा़ राहुलवाडी, पंचवटी) व एक विधिसंघर्षित बालक असे तिघे जण सोमवारी रात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास त्रिकोणी बंगल्यासमोरील पटांगणात संशयास्पदरीत्या फिरत होते़ गस्ती पथकाने त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे चॉपर, नायलॉन दोरी, मिरचीची पूड सापडली़ पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी दरोडा टाकण्यासाठी जात असल्याची कबुली दिली़ पोलिसांनी मुस्तफा सय्यद व संदेश पगारे यास अटक केली आहे़
दाभाडी परिसरात पावसाने शेतकऱ्यांत समाधान
By admin | Published: September 10, 2014 9:56 PM