नाशिक : गेल्या वर्षी किसान क्रांती मोर्चाची धग संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविणाऱ्या नाशिक जिल्ह्णात यावर्षी मात्र शेतकरी संपाचा प्रभाव दिसून आला नाही. त्यामुळे राष्ट्रीय किसान महासंघाच्या देशव्यापी संपातील नाशिकच्या समन्वयकांनी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यास सुरुवात केली असून, यापुढे शेतकरी नेत्यांनी एकजुटीने लढ्यात उतरण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.राष्ट्रीय किसान महासंघाच्या देशव्यापी संपात नाशिकच्या समन्वयकांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी मंगळवारी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या काही नेत्यांसोबत चर्चा करून माध्यमांसमोर येण्याची तयारी केली होती. परंतु नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या नेत्यांनी आपली भूमिका शेतकरी संपाची नसून शेतकºयांच्या मागण्यांसाठी वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय किसान महासंघाच्या समन्वयकांचे नुकसानच होणार आहे. तरी अमृता पवार यांनी आपण शेतकरी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला असून नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समिती याच मार्गाने शेतकºयांसाठी लढा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रीय किसान महासंघाच्या देशव्यापी संपाला नाशिक जिल्ह्णात सुरुवातीचे दोन दिवस काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला. परंतु त्यानंतर शेतकºयांच्या मनातील संताप धगधगता ठेवण्यासाठी जिल्ह्णात खंबीर नेतृत्व नसल्याने संपाची धग ओसरून जिल्ह्णातील बाजारपेठांमधील व्यवहार सुरळीत सुरू होऊ लागले. त्यामुळे संपाची तीव्रता कमी होत असल्याचे पाहून राष्ट्रीय किसान महासंघाचे नाशिकचे समन्वयक शंकर दरेकर यांनी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या नेत्या तथा जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करून संयुक्त भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली. परंतु, अमृता पवार उपस्थित नसल्याने पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. मात्र, याविषयी आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे अमृता पवार यांनी स्पष्ट केले आहे. शेतकºयांच्या हितासाठी व शेतकºयांच्या मागण्या सरकार समोर मांडण्यासाठी नाशिक जिल्हा आंदोलन समितीचे सत्याग्रह आंदोलन सुरू असून त्याअंतर्गत नाशिकचे आमदार व खासदारांसह पालकमंत्र्यांच्या कार्यालयांसमोर सत्याग्रह करून त्यांना शेतकºयांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. नाशिक जिल्हा शेतकरी आंदोनल समितीने हा सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला आहे. किसान महासंघाच्या संपासोबत आपले नाव जोडण्याचा प्रयत्न होत असून आपल्याला त्याविषयी कोणतीही कल्पना नाही. - अमृता पवार, नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समिती
नाशकात शेतकरी संपाची धग वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 12:28 AM
नाशिक : गेल्या वर्षी किसान क्रांती मोर्चाची धग संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविणाऱ्या नाशिक जिल्ह्णात यावर्षी मात्र शेतकरी संपाचा प्रभाव दिसून आला नाही. त्यामुळे राष्ट्रीय किसान महासंघाच्या देशव्यापी संपातील नाशिकच्या समन्वयकांनी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यास सुरुवात केली असून, यापुढे शेतकरी नेत्यांनी एकजुटीने लढ्यात उतरण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
ठळक मुद्देएकजुटीचा प्रयत्न : किसान महासंघाकडून स्थानिक नेत्यांशी चर्चा