पांडाणे : थंडी आणि धुक्यापासून संरक्षण व्हावे म्हणून दिंडोरी तालुक्यात द्राक्षबागा वाचविण्यासाठी पेपरचे आच्छादन टाकण्याचे काम सुरू आहे. द्राक्षपंढरी संबोधल्या जाणाºया दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष बांगलादेशात निर्यात होत असले तरी जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात व फेब्रूवारीच्या पहिल्या आठवडयात वाढलेल्या थंडीमुळे उत्पादकांना हुडहुडी भरली आहे. दिंडोरी तालुक्यातील थंडीचे प्रमाण १२.१ सेल्सीयस असले तरी दिवसा उष्णाचे चटके बसत असून तरी थंडीपासून साखर कमी होवू नये व द्राक्षांचा दुधीरंग जावू नये म्हणून उन्हापासून साखर उतरलेल्या द्राक्षांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. निर्यातक्षम द्राक्षांना शेतकरी पेपराचे आच्छादन लावून आपली द्राक्षे बाहेरच्या देशात कसे जातील यासाठी प्रयत्न करत आहेत. द्राक्षांसाठी पेपर तेरा रु पये किलो प्रमाणे एकरी चार क्विंटल , मजूरी दहा ते १२ हजार , एकरी १८ ते विस हजार रु पये खर्च येतो. कागद लावल्यामुळे द्राक्षांची साईज वाढते, द्राक्ष घड़ाचा दुधी कलर टिकून राहतो. निर्यात क्षम द्राक्षांना ७० ते ८० मणी एका घडात असावेत. द्राक्ष साईज १५ मिली मिटर ते १८ मिली मिटर पाहिजे. द्राक्षाचे गोळी १५ ते १६ ब्रिक्स असली पाहिजे. तेव्हाच द्राक्ष निर्यात होत असल्याचे मत निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी सदाशिव चव्हानके यांनी सांगितले .
द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 3:18 PM