खरीपात लागवड केलेल्या पोळ कांद्याचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकºयांना या कांद्यावर नागर फिरविण्याची वेळ आली. जो काही थोडाफार कांदा वाचला त्याची ही परीस्थिती फारशी चांगली नाही. कांद्याला तेजी नसती तर हा कांदा शेतकº्यांनी सोडून दिला असता, कारण सरासरी उत्पादन एवढे कमी आहे कि तो काढण्याचा खर्च देखील निघाला नसता. परंतु सद्या कांद्याला तेजी असल्यामुळे शेतकरी कांदा मोठया मेहनतीने शेतातून काढत आहेत. कांद्याला अवकाळी चा फटका बसल्यामुळे त्याची वाढ खुंटली, हा कांदा वजनाने हलका आकारमानाने खूप लहान असल्यामुळे मजुरीचा खर्चही वाढला आहे. अनेक ठिकाणी एकरी पाच ते दहा क्विंटल देखील उत्पादन निघत नाही अशी अवस्था आहे.परंतु उत्पादन खर्च तरी सुटेल या आशेने शेतकरी कांदा शेतातून काढत आहेत. यामुळे बाजार समितीत कांदा विक्र ी करण्यासाठी येणाº्या वाहनांमध्ये अत्यल्प कांदा असतो. कांद्याने भरलेले वाहन दिसणे तर दुर्मिळच झाले आहे.***** महागाची कांदा बियाणे आणून एक एकर क्षेत्रावर पोळ कांद्याची लागवड केली. यासाठी आतापर्यंत तीस हजार रूपये खर्च झाला आहे.अवकाळी पावसाने कांद्याचे खूप नुकसान झाले. त्याचे गळीत चांगले झाले नाही. बराचसा कांदा शेतातच सडून गेला आहे. राहीलेला कांदा शेतातून काढण्याचे काम सुरू आहे. परंतु अत्यल्प कांदे निघाल्यामुळे उत्पादन खर्च निघण्याची देखील शाश्वती अस्थिर बाजारभावामुळे आता राहीली नाही.- भागाबाई देवरे , शेतकरी,वाजगाव .
कांदा बाजारभावातील चढउतारीमुळे शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 5:53 PM
देवळा : दररोज बाजार समितीत तीन ते चार हजार रु पयांनी कोसळणारे किंवा वाढणारे कांद्याचे दर, चोवीस तासात कांद्याच्या दरात पडणाऱ्या या तफावतीमुळे होणाºया या आर्थिक नुकसानाचा शेतकº्यांच्या मानसिकतेवर विपरीत परीणाम होत असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
ठळक मुद्देबाजार भाव तेजीत असले तरी शेतकऱ्यांना एकरी उत्पादन अवघे दहा क्विंटल देखील निघणे कठीण झाले असल्यामुळे तेजी असूनही उत्पादन खर्च देखील निघत नसल्याची व्यथा शेतकºयांनी मांडली आहे.