नांदूरवैद्य : येथील करंजकर मळा परिसरातील पिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य विद्युत वाहिन्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून सदर वीजवाहिन्या लोंबकळत असून या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे त्याची लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतरक्यांनी केली आहे.नांदूरवैद्य परिसरातील करंजकर यांच्या मळ्यापासून गेलेल्या येथील अशोक यशवंत मुसळे व दत्तू बाबुराव काजळे यांच्या शेतीतील पाणीपुरवठा करत असलेल्या मुख्य विद्युतपुरवठा करणाºया तारा जीवघेण्या परिस्थितीत असल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकर्यांनी याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना दूरध्वनीवरून माहिती दिली असता सदर अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. लोंबकळलेल्या वीजवाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन शॉर्टसर्किट होण्याची भीती येथील शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. या लोंबकळत असलेल्या वीजवाहिन्यांमुळे येथील शेतकºयांची शेतीची कामे रखडली आहेत. तसेच ऐन पिकांना पाणी भरण्याची वेळ असून या ठिकाणी जाण्यास शेतकरी घाबरत आहेत. वीजवितरण कंपनीचे वाकलेले खांब व लोंबकळत असलेल्या वीजवाहिन्या मृत्यूला आमंत्रण देत आहे.या परिसरात अनेक ठिकाणी अशीच अवस्था असल्याने काही शेतकर्यांचे शेतीचे नुकसान देखील झाले आहे. याच पाशर््वभूमीवर वीजवितरण कंपनीच्या या गलथान कारभारामुळे येथील शेतकरी त्रस्त झाले असून वीज वितरण कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष देवून सदर वीजवाहिन्यांची लवकरात लवकर दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
लोंबकळणा-या वीजतारांनी शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 2:41 PM