नाशिक : कर्जबाजारीपणाला कंटाळून देवळा तालुक्यातील माळवाडी येथील शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, आजवर ८३ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे.राजेंद्र धोंडू बागुल (४९) असे शेतकºयाचे नाव असून, शेतातच त्यांनी विषारी औषध सेवन केले. सदर बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले; परंतु प्रकृती खालावल्याने रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना बागुल यांचे निधन झाले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या नावे शेती असून, श्री संत सावता माळी पतसंस्थेचे ५० हजाराचे कर्ज आहे.केंद्रीय कर्मचाºयांचा डीए वाढलालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी व पेन्शनर्स यांचा महागाई भत्ता (डीए व डीआर) एक टक्क्याने वाढवून तोपाच टक्के करण्याचाही केंद्रसरकारने मंगळवारी निर्णयहीघेतला.डीएमधील वाढीचा फायदा ५0 लाख केंद्रीय कर्मचाºयांना तर डीआरमधील वाढीचा ६१ लाख पेन्शनर्सना मिळणार आहे. ही वाढ १ जुलै २0१७ पासून लागू होणार आहे. यामुळे २0१७-१८ या आर्थिक वर्षातील आठ महिन्यांच्या काळासाठी केंद्राच्या तिजोरीवर अनुक्रमे ३0६८ कोटी २६ लाखांचा व २0४५ कोटी ५0 लाख रुपये इतका अधिक भार पडणार आहे.२0 लाखांपर्यंतचीग्रॅच्युइटी करमुक्तकेंद्र सरकारने आता २0 लाख रुपयांपर्यंतच्या ग्रॅच्युइटीवर कर न लावण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय संघटित म्हणजेच सरकारी व खासगी क्षेत्राला लागू असेल. आतापर्यंत १0 लाख रुपयांपर्यंतच्या ग्रॅच्युइटीवर कर आकारला जात नसे. हा बदल १ जानेवारी २0१६ पासून लागू होणार आहे.वेगळी कंपनीयाखेरीज बीएसएनएलच्या ६0 हजार टॉवर्ससाठी वेगळी कंपनी बनवून तिचे बीएसएनएलपासून विभाजन करण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
माळवाडी येथील शेतकºयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:29 AM