नाशिक : कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र कायम असून, मालेगाव तालुक्यातील पाटणे येथील मेघनाथ भिकन खैरनार (५८) या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जिल्ह्यात आजवर ३० शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.चार महिन्यांत २९ शेतकºयांनी आत्महत्या केल्याने महिन्याला सरासरी सात शेतकरी जीवनयात्रा संपवित आहेत. आत्महत्या रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करीत असतानाही आत्महत्येचे सत्र थांबत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदवड येथील प्रकाश निवृत्ती बस्ते (५२) या शेतकºयाने आत्महत्या केली, त्यापाठोपाठ मालेगाव तालुक्यात दुसरी घटना घडली. मालेगावात सात शेतकºयांनी आत्महत्या केली असून, दिंडोरीत सहा शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. बागलाण, निफाडमध्ये प्रत्येकी तीन शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.
पाटणेत शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 12:02 AM
नाशिक : कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र कायम असून, मालेगाव तालुक्यातील पाटणे येथील मेघनाथ भिकन खैरनार (५८) या शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जिल्ह्यात आजवर ३० शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.
ठळक मुद्देनिफाडमध्ये प्रत्येकी तीन शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.