वणी/खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील प्रकाश निवृत्ती बस्ते यांनी शनिवारी सायंकाळी द्राक्षबागेचे फवारणीचे विषारी औषध पिवून आपली जीवनयात्रा संपवली. श्री बस्ते यांनी सायंकाळच्या सुमारास घरात कोणीही नसतांना विषारी औषध सेवन केले. काही वेळाने त्यांच्या पत्नीने घरातील खोलीत बस्ते यांना खोकतांना बघितले व आरडाओरडा केला व तात्काळ ग्रामस्थ मदतीला धावुन आले. त्यांना खेडगाव येथील रु ग्णालयात हलविले परंतु तेथुन नाशिक जिल्हा रु ग्णालयात नेण्यास सांगितले. नाशिक जिल्हा रु ग्णालयात पोहताच प्रकाश बस्ते यांनी प्राण सोडले. प्रकाश बस्ते यांची तीन एकर शेती असुन मागील काही काळात पिकाला भाव नाही. मुलीच्या लग्नाला उसनवारी केली, त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत चालला होता.त्यात दुष्कळाशी दोन हाथ करतांना बस्ते खचले होते. सोन्यासारखं बाजरी पिक शेतात उभं परंतु पाणी नाही त्यामुळे ते हतबल झाले होते. तसेच शेतीतुन उत्पादन खर्चही निघत नसल्याने त्यांच्यावर कर्ज वाढत चालले होते असे त्यांच्या नातलगांनी सांगितले. बस्ते यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली एक मुलगा,आई,भाऊ,पुतणे असा परिवार आहे. एका मुलीचे मागील वर्षीच लग्न झाले असुन दुसºया मुलीचे शिक्षण सुरु आहे.
शिंदवड येथे शेतकऱ्याची आत्महत्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:46 PM