वणी : अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीमुळे उत्पादनात आलेली घटीमुळे सोयाबीनचे दर गगनाला भिडण्याच्या संकेतामुळे शेतकऱ्यांचा साठवणुकीकडे कल वाढला आहे. दिंडोरी तालुक्यात सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते. सोयाबीन या पिकावर रोगाच्या प्रादुर्भाव शक्यता कमी व हमखास आर्थिक स्थैर्य देणारे अशी ओळख सोयाबीनची आहे. सोयाबीन हे प्रामुख्याने धुळे येथे विक्र ी करण्यात येते. सोयाबीनच्या पावडरपासुन तेल तयार करणे. प्रोटीन्स तयार करणाºया पदार्थामधे वापरणे सोयाबिनची वडी तयार करणे असा वापर सोयाबीनचा करण्यात येतो. मात्र प्रामुख्याने धुळे येथील मिलमध्ये तेल उत्पादनासाठी सोयाबीन खरेदी करणाºया अनेक मिल असुन हे सर्व सोयाबीन त्याठिकाणी विक्रीसाठी जाते. दरम्यान, खरेदी करण्यापुर्वी विविध मशीनद्वारा दर्जा प्रतवारी या बाबी निकषाच्या कसोटीला पार पडल्या तर चांगला भाव देण्यात येतो. निकष पुर्ण झाले नाही तर माल नाकारण्यात येतो. दरम्यान भुतकाळात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन या पिकाची प्रचंड हाणी झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट आली आहे. तरीही उर्वरित राहिलेले सोयाबीन सुरक्षित राहुन विक्र ी करण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरु आहे. तालुक्यात अनेक व्यापारी सध्या सोयाबीन खरेदीत गुंतलेले आहेत. हा सर्व माल खरेदी करुन वेअर हाऊस तसेच गुदामामध्ये साठवणुक करु न भविष्यातील दरवाढीचा अंदाज पाहुन ही प्रक्रि या सुरु आहे. दरम्यान, दुसºया तालुक्यातुनही सोयाबीन खरेदीचे नियोजन घाऊक व्यापारी यांनी आखल्याने सध्या उत्पादकांना मिळणाºया दरापेक्षा गुंतवणुक करु न साठवुन ठेवलेल्या मालाला मागणी वाढण्याच्या संकेतानुसार सोयाबीन खरेदीच्या प्रणालीत अनेकांनी नशिब अजमावण्यासाठी धाडस केले आहे.
दरवाढीच्या शक्यतेने सोयाबीन साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:40 PM