पाटोदा : शेतात उत्पादित केलेल्या कोणत्याच पिकास दर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सध्या बाजारात विक्र ीसाठी नेलेल्या, शेपू, पालक, मेथीच्या भाजीला कुणी फुकटही घेत नसल्याने शेतकऱ्यांनी मेथीच्या जुड्या रस्त्याच्या कडेला टाकून जनावरांना चारा म्हणून खाऊ घातल्या आहेत. मेथीपाठोपाठ कोथिंबिरीलाही दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.सध्या कांदा पिकास मिळत असलेला दर सोडला तर अन्य कोणत्याच पिकास भाव मिळत नसल्याने शेतकरीवर्गाने मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली, मात्र ज्या शेतकºयांकडे कांदा लागवडीसाठी कांदा रोपे शिल्लक नाही व रोपे उपलब्ध होण्याची शक्यता नाही अशा शेतकºयांनी मोठ्या आशेने भाजीपाला पिकाचे उत्पन्न घेतले, मात्र भाजीपाला पिकासही मातीमोल दर मिळत असल्याने शेतकºयांची अवस्था आगीतून निघून फुफाट्यात गेल्यासारखी झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून येवला तालुक्यातील शेतकºयांनी दुष्काळाशी सामना करून शेतीत आधुनिक प्रयोग करीत उत्पादन घेत आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून उत्पादित केलेल्या कोणत्याच पिकाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटांचा सामना करीत आहेत. मागील वर्षी पिकविलेला पोळ, रांगडा व उन्हाळ कांदा मातीमोल दरात विकला. त्यासाठी शेतकºयांनी एकरी सत्तर ते ऐंशी हजार रु पये खर्च केला, मात्र हातात काहीच पडले नाही. त्यामुळे शेतकºयांना लाखो रु पयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागला. अनेक शेतकºयांनी कांदा उकिरड्यावर तसेच जनावरांना खाऊ घातला. शेकडो क्विंटल कांदा हा खराब झाला, त्याचाही आर्थिक फटका शेतकºयांना बसला. यावर्षी झालेल्या परतीच्या पावसाने पोळ कांदा पूर्णत: खराब झाला आहे. एकरी फक्त दहा ते बारा क्विंटल उत्पन्न निघाले. अशाही परिस्थितीत शेतकरी वर्गाने या पिकात नाही तर दुसºया पिकात आपल्याला काही फायदा होईल या आशेवर आपल्या शेतामध्ये शेपू, पालक, मेथी यांसारख्या भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली, मात्र त्यांनाही कवडीमोल दरामुळे केलेला खर्चही न निघाल्याने अनेक शेतकºयांनी शेळ्या-मेंढ्या व जनावरांना खाद्य म्हणून हा भाजीपाला खाऊ घातलाल, तर कोथिंबिरीच्या मोठ्या जुडीला पन्नास ते साठ रु पये शेकडा दर मिळत आहे. तर मेथीची भाजी विकत तर सोडा कुणी फुकटही घेण्यास तयार नाही अशी वाईट अवस्था झाली असल्याने शेतकरीवर्ग पुन्हा संकटात सापडला आहे.कर्ज कसे फेडायचे?परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणात मोठा बदल झाला असल्याने सर्वच पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकरी वर्गाने हजारो रु पये खर्च करून पिके घेतली, मात्र उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य दर मिळत नाही. पीक उभे करण्यासाठी हजारो रु पये खर्च करूनही उत्पन्नाची व खर्चाची मिळवणी होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. फवारणीचा खर्च कर्ज काढून करावा लागला असून, आता कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत.परतीच्या अवकाळी पावसाने खरीप हंगामाचे होत्याचे नव्हते केले. उधार उसनवार करून रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी बियाणे टाकली. मात्र दाट धुके व दवामुळे दोन वेळेस रोप खराब झाल्याने कांदा लागवडीचा नाद सोडून दिला व शेतात भाजीपाला पिकाची लागवड केली. मात्र, सध्या भाजीपाला पिकास मातीमोल भाव मिळत असल्याने केलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने तोटा होत आहे. त्यामुळे आता कोणती पिके घ्यावीत, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.- माधव शेळके, शेतकरी, ठाणगाव
शेतकऱ्यांनी मेथी फेकली रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 10:28 PM
पाटोदा : शेतात उत्पादित केलेल्या कोणत्याच पिकास दर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. सध्या बाजारात विक्र ीसाठी नेलेल्या, ...
ठळक मुद्देबाजारभावाचा परिणाम : फुकटही कुणी घेईना; शेतकरी सापडले आर्थिक संकटात