खामखेडा : विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे यापुढे रोख न देता एनइएफटी, आरटीजीएस किंवा धनादेशाद्वारे देण्यात येणार असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे.केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया बॅँकिंग व्यवहार धोरणास चालना देण्यासाठी शासनाने १ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांना शेतमालाची विक्र ी केल्यानंतर विक्र ीचे पैसे रोख न देता ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आरटीजीएस, एनइएफटी किंवा चेकद्वारे देण्यात येणार आहे. त्यासाठी त्याला आता बॅँकेत खाते असणे आवश्यक आहे, कारण लिलावास माल आणताना सोबत आधारकार्ड व बॅँक पासबुक झेरॉक्स लागणार आहे. विक्र ी केलेल्या मालाचे पैसे रोख मिळणार नसल्याने वाहनाचे भाडे खिशातून द्यावे लागणार आहे.पन्नास टक्के शेतकºयांकडे आजही शेतमाल विक्र ीस नेण्यासाठी स्वत:चे वाहन नाही. तेव्हा त्यांना शेतमाल बाजार समितीत नेण्यासाठी भाड्याचे वाहन न्यावे लागते. शेतमाल विक्र ी झाल्यावर विक्र ी केलेल्या मालाचे पैसे हे व्यापारी वर्गाकडून रोख स्वरूपात दिले जात असे. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टर, टेंपो किंवा इतर वाहनांचे भाडे देत असे. त्यामुळे वाहनभाड्याची चिंता राहत नसे; परंतु आता शासनाने यात बदल केल्याने शेतमाल विक्र ीस नेण्यासाठी लागणाºया वाहन भाड्याचे पैसे वाहनधारकास तर रोख द्यावे लागणार आहे. तेव्हा वाहन भाड्याने नेण्याआधी शेतकºयाला वाहनाचे भाड्याचे पैसे तयार ठेवावे लागणार आहे.यामागे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी शेतमाल विक्र ी करण्यासाठी वाहन भाड्याने घेऊन जातो आणि त्या वाहनांचे भाड्याचे पैसे शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर विक्र ी केलेल्या मालाचे पैसे रोख मिळत असे, त्यामुळे शेतकºयाला वाहन भाड्याची चिंता राहत नसे. तेव्हा शेतकरी त्या मिळालेल्या पैशातून वाहनांचे भाडे देत असे. तसेच पिकासाठी लागणारी खते, त्याच वाहनातून घरी आणत असे. आता शेतकºयाला शेतमाल बाजारात नेण्याआधी वाहनभाडे तयार ठेवावे लागणार आहे.
आॅनलाइन बॅकिंग व्यवहारामुळे शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 6:36 PM
विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे यापुढे रोख न देता एनइएफटी, आरटीजीएस किंवा धनादेशाद्वारे देण्यात येणार असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे.
ठळक मुद्देडिजिटल इंडिया : वाहनाचे भाडे खिशातून द्यावे लागणार