गुळवंच : सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील गुळवंच व परिसरात गेल्या तीन वर्षांपासून एकही समाधानकारक पाऊस झाला नाही. यंदाही त्याची पुनरावृत्ती झाली असून, सध्या पिकांना पाण्याची गरज असल्याने शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत देवाची करुणा भाकू लागले आहेत. परिसरातील बारागावपिंप्री, पाटपिंप्री, निमगाव सिन्नर, केपानगर, दगडवाडी त्याच्या पूर्वेकडील भागात पाऊसच झाला नाही. श्रावण महिन्यात झालेल्या रिमझिम पावसावर पिके आली आहे. या भागातील बाजरी, कणीस भरण्याच्या अवस्थेत असून त्यामुळे या पिकाला जास्त पाण्याची गरज आहे. मात्र पाणी देण्यासाठी या भागातील सर्वच जलस्रोत कोरडे असल्याने विहिरींना पाणी आले नाही. परिणामी पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहे. मात्र परिसरातही पाणी नसल्याने शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. सिन्नरपासून पूर्वेकडे टिपूसही झाला नसल्याने या परिसरातील एकही बंधारा अद्याप भरला नसून जे बंधारे पाण्याने भरायला हवे होते ते बंधारे केवळ रिमझिम पावसाने या गवत उगवल्याने हिरवेगार झाले आहेत. जेथे पिण्याच्या पाण्याची भ्रांत तेथे पिकांना पाणी कोठून देणार असा
शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: October 09, 2014 11:15 PM