पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यापारी, हॉटेलचालकाला कोरोना संसर्ग झाल्याने तीन दिवस बाजार समिती बंद ठेवल्यानंतर शुक्रवारी (दि.२९) बाजार समितीतील सर्व व्यवहार पूर्ववत झाले. मात्र शेतकऱ्यांनी कोरोनाची मोठ्या प्रमाणात धास्ती घेतल्याचे दिसून येत असून, बाजार समितीत दुपारी केवळ वीस टक्के शेतमालाची आवक झाली आहे. बाजार समितीत दुपारी २२६ पिकअपमधून विविध फळभाज्या दाखल झाला होता. शेतकºयांनी बाजार समितीकडे पाठ फिरविल्याने जवळपास दोन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, बाजार समितीचा अंदाजे दोन लाख रुपयांचा बाजार समितीचा महसूल बुडाला आहे.संपूर्ण देशभरात हाहाकार माजविणाºया कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढला आहे. गेल्या आठवड्यात दिंडोरीरोड नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला व्यापारी व हॉटेलचालकाला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याने खडबडून झालेल्या बाजार समितीने मंगळवार ते गुरुवार असे सलग तीन दिवस बाजार समितील सर्व व्यवहार बंद ठेवले होते. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन अंदाजे बाराशे पिकअप भरून शेतमालाची आवक होत असते. मात्र शुक्रवारी (दि.२९) दिवसभरात केवळ २२६ पिकअप फळभाज्यांची आवक आली. त्यामुळे मुंबईसह मुंबई उपनगरला पाठविल्या जाणाºया मालावरही त्यांचा परिणाम झाला आहे, मुंबईसह मुंबईतील उपनगरांना नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून दररोज ४५ ते ५० वाहनांमधून शेतमाल पाठविला जातो. मात्र शुक्रवारच्या दिवशी केवळ अंदाजे पंधरा चारचाकी फळभाज्या मालाची रवानगी करण्यात आली. बाजार समितीत आज केवळ फ्लॉवर, कारले, ढोबळी मिरची, काकडी, वांगी, दोडका, भोपळा, गिलके, फळभाज्यांची आवक आली होती.प्रवेशद्वारावर सॅनिटायझरचा वापरबाजार समितीत कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून बाजार समिती प्रवेशद्वारावर शेतकºयांना सॅनिटायझर लावून आत सोडण्यात आले. शेतकरी आणि वाहनचालकाचे यंत्राद्वारे तापमान मोजण्यात आले. बाजार समितीत येणाºया भाजीपाला चारचाकी वाहनांचे क्रमांक नोंदवून घेण्यात आले, तसेच किरकोळ विक्रीला पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याने केवळ अधिकृत परवानाधारक व्यापारी व हमालांना प्रवेश देण्यात आला होता. चवली दलाली किरकोळ विक्री आगामी आदेश येईपर्यंत बंदच राहणार असल्याचे बाजार समिती सचिव अरुण काळे यांनी सांगितले.
शेतक ऱ्यांनी घेतली कोरोनाची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 12:26 AM
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यापारी, हॉटेलचालकाला कोरोना संसर्ग झाल्याने तीन दिवस बाजार समिती बंद ठेवल्यानंतर शुक्रवारी (दि.२९) बाजार समितीतील सर्व व्यवहार पूर्ववत झाले. मात्र शेतकऱ्यांनी कोरोनाची मोठ्या प्रमाणात धास्ती घेतल्याचे दिसून येत असून, बाजार समितीत दुपारी केवळ वीस टक्के शेतमालाची आवक झाली आहे.
ठळक मुद्देबाजार समिती २० टक्के च आवक : दोन कोटींची उलाढाल ठप्प