नाशिक : शेतातील पिकाची तलाठ्याकडे जाऊन पीकपेरणी करण्यात शेतकºयांनी वेळ वाया घालविण्यापेक्षा आपल्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातूनच घरबसल्या सातबारा उताºयावर त्याची नोंद करण्याची प्रणाली टाटा ट्रस्टने विकसित केली असून, त्या माध्यमातून राज्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाचा निर्णय शासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यासह राज्यातील पाच तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.टाटा ट्रस्टने यासाठी स्मार्टफोनसाठी अॅप विकसित केले असून, प्रायोगिक पातळीवर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील मौजे करंजपाडा येथे हा प्रयोग राबविण्यात येऊन त्यात मिळालेल्या यशस्वीतेच्या आधारे आता सहा तालुक्यांत त्याची चाचपणी घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यात दिंडोरीसह कामठी (नागपूर), अचलपूर (अमरावती), फुलंब्री (औरंगाबाद), बारामती (पुणे) व वाडा (पालघर) या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रामुख्याने शेतकरी प्रत्येक हंगामात घेत असलेल्या पिकाची सातबारा उताºयावर नोंद घेण्याची जबाबदारी तलाठ्यांवर निश्चित करण्यात आली असली तरी, तलाठ्यांकडील अन्य कामांचा व्याप पाहता त्यांच्याकडून शेतकºयांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे कार्यालयात बसूनच पीक पेरणीची नोंद घेतली जात होती. परंतु त्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीसह अनेक त्रुटी निर्माण होत असे. बहुतांशी वेळा शेतकरी शेतात पीक पेरत नसतानाही त्याची नोंद तलाठ्याकडे जाऊन करून घेत, नंतर मात्र नैसर्गिक आपत्ती अथवा पीक नुकसानीचा प्रश्न निर्माण झाल्यावर कायदेशीर प्रश्न उपस्थित होण्याबरोबर शेतात पेरलेल्या पिकावरच कृषिकर्ज दिले जात असल्याने त्यातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी अॅप उपयोगी ठरणार आहे.तलाठ्याकडे नोंद करणे आवश्यकशेतकºयांनी या अॅपचा वापर करण्यापूर्वी संबंधित गाव तलाठ्याकडे स्वत:चा भ्रमणध्वनी क्रमांक नोंद करणे आवश्यक असून, अॅपमध्ये सातबारा उताºयातील सारे रकाने असल्यामुळे गटनंबर, सर्व्हेनंबर, क्षेत्र, पिकाचा प्रकार आदी बाबींची नोंद करणे बंधनकारक राहणार आहे. ज्या शेतकºयाकडे स्मार्ट भ्रमणध्वनी नसेल त्याचे साध्या फोनने लघुसंदेश (एसएमएस)माध्यमातूनदेखील पीक पेरणीची माहिती पाठविता येणार आहे. मात्र ज्याच्याकडे फोन नाहीच त्यांनी त्या गावच्या तलाठ्याकडे जाऊन त्याच्या आधारे नोंद करण्याची सोय आहे.असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. शेतकºयांनीच स्वत:च पीक पेरणीची नोंद करावी व दर पंधरवडा, महिना अखेर पिकाचे शेतातील छायाचित्र अॅपवर लोड केल्यास या संदर्भातील सर्व वादविवादांना पूर्णविराम मिळणार आहे.
सातबारावर शेतकरीच करणार पीकपेऱ्याची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 2:16 AM
शेतातील पिकाची तलाठ्याकडे जाऊन पीकपेरणी करण्यात शेतकºयांनी वेळ वाया घालविण्यापेक्षा आपल्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातूनच घरबसल्या सातबारा उताºयावर त्याची नोंद करण्याची प्रणाली टाटा ट्रस्टने विकसित केली असून, त्या माध्यमातून राज्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाचा निर्णय शासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यासह राज्यातील पाच तालुक्यांची निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्देदिंडोरीची निवड : राज्यात प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग