मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात मागील आठ ते दहा दिवसापासून सोयाबीन, बाजरी सोंगणीचे काम सुरु असून दोन ते तीन दिवसांपासून सोयाबीन आणि बाजरी मशीनद्वारे तयार करण्याचे काम चालू आहे. रविवारी (दि.१३) अचानक ढगाळ वातावरण आणि अल्पशा पावसाच्या शिडकाव्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.आॅक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली असून सातत्याने दमट वातावरण निर्माण होत असून रविवारी नेहमी पेक्षा अधिक दमट वातावरण असल्याने दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान अचानक आकाशात काळे ढग जमा झाल्याने पावसाचा शिडकावा सुरू झाल्याने सोयाबीन आणि बाजरी उत्पादकांची एकच तारांबळ उडाली होती.अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन आणि बाजरी सोंगण्यासाठी मजुरांची वानवा भासत असल्याने काही ठिकाणी बाजरी आणि सोयाबीन शेतातच उभी असून सोंगण्याची बाकी असल्याने ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला असल्याचे दिसून येत आहे. त्यात मान्सून हा परतीच्या वाटेवर असल्याने मान्सून बरसला तर शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर यंदा पिकांच्या सोंगण्या आल्या असून त्यात परतीचा पाऊस बरसला तर पिके हातातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 7:16 PM
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात मागील आठ ते दहा दिवसापासून सोयाबीन, बाजरी सोंगणीचे काम सुरु असून दोन ते तीन दिवसांपासून सोयाबीन आणि बाजरी मशीनद्वारे तयार करण्याचे काम चालू आहे. रविवारी (दि.१३) अचानक ढगाळ वातावरण आणि अल्पशा पावसाच्या शिडकाव्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
ठळक मुद्देपरतीचा पाऊस बरसला तर पिके हातातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त