वणी : कांद्याच्या दरात तुलनात्मकरित्या घसरण होत असल्याने उत्पादकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे उत्पादक चिंतित झाले आहेत. कांदा आयात करण्यासाठीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील उत्पादक चिंतित झाले असून सदर निर्णय रद्द करु न उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी ग्रामिण विकास कृषी व किसान कल्याण पंचायत राज मंत्री नरेन्द्र सिंह तोमर यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केन्द्रीय वाणिज्य मंत्रालयाने निर्यातमुल्य ८५० डॉलर मेट्रीक टन स्थिर केला आहै. तसेच केंन्द्र शासनाच्या एम एम टि सी या व्यापार कंपनीने दोन हजार टन कांदा आयातीची निविदा प्रसिद्ध केली आहे. हा निर्णय उत्पादकांना मारक आहे . त्यामुळे निर्यात मूल्य शुन्य करु न आयात निविदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान येत्या महिनाभारात महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे ,जळगाव व औरंगाबाद या पाच जिल्ह्यातील ८५ ते ९० टक्के कांदा आवक होणार आहे तसेच लासलगाव बाजार समितीत कांदा आवक होणार असल्याने याचा विचार करु न नमुद निर्णय रद् करण्याची मागणी पत्रात करण्यात आली आहे. भारतात उत्पादीत कांद्यापैकी ३३ टक्के कांदा महाराष्ट्रात उत्पादीत होत असुन हा कांदा दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण असल्याने निर्यात मोठ्या प्रमाणावर होते, असाही उल्लेख पत्रात आहे. दरम्यान सद्यस्थितीत कांद्याच्या दरात तुलनात्मकरित्या घसरण होत असल्याने उत्पादकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे उत्पादक चिंतित झाले आहेत तर कांदा दर वाढीबाबत धोरणांचा विचार करु न हे दर नियंत्रण आणण्यासाठी केन्द्रीय पातळीवर घेण्यात येणारे क्र मप्राप्त निर्णय यामुळे दुहेरी कात्रित सापडल्यासारखी अवस्था उत्पादकांची झाली आहे.
कांदा भावात घसरण, शेतकरी चिंंतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 2:47 PM