शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
5
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
6
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
8
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
9
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
10
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
11
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
12
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
13
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
14
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
15
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
16
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
17
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
18
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
19
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
20
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!

येवला बाजार समितीत कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतित

By admin | Published: June 18, 2017 12:50 AM

कांदा अवघा ४७५ रुपये : गेल्या आठवड्यातील संपाचा मोठा परिणाम

कांदा अवघा ४७५ रुपये : गेल्या आठवड्यातील संपाचा मोठा परिणाम लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : मुख्य बाजार आवारात सकाळी साडेदहाच्या सुमारास केवळ १३ ट्रॅक्टर व एक रिक्षामधून ३०० क्विंटल आवक झाली आणि उन्हाळ कांद्याला किमान रुपये १५० ते कमाल ६५६ रुपये तर सरासरी ५०० रुपये भाव होते. अंदरसूल उपबाजारात १७ ट्रॅक्टर सहा रिक्षा पिकअपमधून ४०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. अंदरसूल येथे कांद्याला किमान १५० रु पये ते कमाल ६०१ रु पये तर सरासरी ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव होते.गेल्या आठवड्यातील संपाचा मोठा परिणाम मार्केटवर झाला. कोट्यवधी रु पयाची उलाढाल ठप्प झाली होती. दरम्यान मार्केट सुरु झाले तरी फारसा उत्साह नाही.पोटाची खळगी आणि पेरणीसाठी पैसे लागतील. पर्याय शिल्लक नसल्याने साठवणीचे उन्हाळ कांदे बाजारात आणल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आवक कमी असल्याने किमान ४७५ रुपये मिळाले. कांदा बाजारभावाच्या चढउताराकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शनिवारी (दि. १७) कांद्याला पुन्हा उतरती कळा लागली. येवला मुख्य बाजार आवारात उन्हाळ कांदा किमान १५० ते कमाल ५९१ तर सरासरी ४७५ रुपये भाव होते, तर उपबाजार अंदरसूल येथे उन्हाळ कांदा किमान १५० ते कमाल ५९० सरासरी ४८० रु पये भाव होते.भाव मिळण्याचा आशावाद४येवला तालुका तसा कोरडाच. दुष्काळाच्या छायेत शेतकरी वावरत असल्याचे नेहमीचे चित्र. कोणत्याही ऋतूत कधी उन्हाळ्यात, हिवाळ्यात अकाली पाऊस, किटकांचा प्रकोप होत असल्याने शेतकऱ्यांच्या वाट्याला काहीही उरले नाही. तरीही पुन्हा नव्या उमेदीने शेतकरी उभा राहत आहे. कांद्याला केवळ ३०० ते ४०० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने पुरती निराशा आहेच. थोड्याफार पाण्यावर जगलेला उन्हाळ कांदा सध्या चाळीत भरला आहे. एक ट्रॅक्टर कांदा चाळीत भरण्यासाठी ४०० ते ५०० रु पये मजुरीचा खर्च, कांदा साठवणीत वातावरण बदलामुळे कांदा खराब होऊ नये म्हणून कीटकनाशके फवारणी करून कांदा साठवण केला आहे.