मानोरी : येवला तालुक्यात ऐन बेमोसमी पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांपासून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मंगळवारी (दि.१६) दुपारी वादळक्ष वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची चांगलीच भंबेरी उडाली होती. अचानक झालेल्या या वातावरण बदलामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक करून सोडली आहे.ऐन उन्हाळ कांदा काढणीला मानोरी परिसरात सुरु वात केलेली असून निम्म्याहून अधिक शेतकºयांच्या शेतात उन्हाळ कांदा काढणीचा तसाच पडून असल्याने मजूर वर्ग ऐन अवकाळी पावसाचा मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीमुळे गत मागील वर्षी खरीप आणि रब्बी हंगामातील दोन्ही पिके पाण्याअभावी करपल्याने पदरी निराशाच पडली असल्याने यंदाच्या अवकाळी पावसामुळे दुसºयांदा उन्हाळ कांदा शेतकºयांना कर्जबाजारी करणार अशी चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे.कांदा साठवून ठेवण्यासाथी कांदा चाळ तयार करण्यासाठी शेतकरी व्यस्त आहे.यंदा पर्जन्यमान कमी प्रमाणात झालेले असले तरी उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली असली तरी उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात आधीच प्रमाणात घट झाली असल्याने या अवकाळी पावसामुळे कांदा नुकसानीची भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे.सध्या उष्णता दिवसेंदिवस वाढतच चालली असताना उन्हाळ कांदा काढणीला मजूर वर्गाची वानवा भासल्याने अनेक ठिकाणी कांदा पीक तसेच शेतात पडून आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने मजूर दिवसभर कांदा काढणीचे काम उन्हात करू शकत नसून काही उन्हात काम करायचे असल्याचे उन्हाळ कांदा काढणीला मजूर वर्ग प्रति एकर आठ हजार रु पये इतका भाव मागत आहे.पाण्याच्या कमतरतेमुळे कांदा बारीक राहिला असुन जमिनीत उष्णता जास्त असल्याने कांदा पातीसह काढण्यास अडथळे निर्माण होत आहेत. कांदा काढण्याचा प्रयत्न केला असता कांदा जमिनीत तर पाथ हातात अशी गत उन्हाळ कांद्याची सध्या झालेली दिसून येत आहे. गत वर्षी उन्हाळ कांद्याने शेतकरी वर्गाला रडकुंडीला आणले होते. सुमारे चार ते पाच महिने जुना उन्हाळ कांदा साठवून ठेवलेला असताना आॅक्टोबर महिन्यापासून शेतकºयांनी उन्हाळ कांदा विक्र ीला काढला होता. परंतु दिवसागणिक हेच गणित कायम राहिल्याने सुमारे चार ते पाच महिने उन्हाळ कांदा कवडीमोल भावाने विकून साधा कांदा उत्पादन खर्च देखील फिटलेला नाही.यामुळे यंदा उन्हाळ कांद्याची चाळीत साठवणूक ठेवत असले तरी भाव किती मिळणार याची शाश्वती कांदा उत्पादक शेतकºयांना नसल्याने यंदा पुन्हा निराशा पदरी तर पडणार नाही ना ! अशी चर्चा कांदा उत्पादक शेतकरी करत आहे.मागील वर्षी उन्हाळ कांद्याने शेतकरी वर्गाला अल्प दरामुळे नाकेनऊ आणले होते. त्यामुळे एकीकडे कांदा विकून खर्च सुद्धा फिटला नसताना मानोरी परिसरात दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत असून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यास दुसर्यांदा शेतकरी कर्जाच्या खायीत लोटला जाणार आहे.- भास्कर चिने, मानोरी.
बेमोसमी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 5:23 PM
मानोरी : येवला तालुक्यात ऐन बेमोसमी पावसाने गेल्या तीन ते चार दिवसांपासून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मंगळवारी (दि.१६) दुपारी वादळक्ष वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची चांगलीच भंबेरी उडाली होती. अचानक झालेल्या या वातावरण बदलामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक करून सोडली आहे.
ठळक मुद्देमोनोरी : उन्हाळ कांदा काढणी अडकल्याने उत्पादन कर्त्यांची दमछाक