औंदाणे : शेतातच आपला संसार उघडयावर थाटुन येथील परीसरातील ग्रामीण भागात मेंढपाळांना मेंढ्यांच्या चाºयासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.हयावर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने पिकाची वाढ खुंटून पीक हातातून वाया गेल्यात जमा आहे. मात्र गुरांचा चाºयासाठी शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. हिवाळा सुरु होण्यापुर्वीच चारा व पाणी टंचाई भासु लागली आहे. वातावरणात बदल होत असल्याने उन्हाचा तडाखा जाणवु लागल्याने गवतही वाळले आहे. सध्या मका पीक काढण्याचे काम सुरू असून मोकळया शेतात मेंढपाळ आपला संसार घोडयाच्या टांग्यात भरुन मेंढयाना चारण्यासाठी शेतातच उघडयावर लहान मुलांसह कुंट्रुबाचा संसार थाटून हया मका पिकाचे शेतात मेंढया चारताना दिसत आहेत. आॅक्टोबर पासुनच पाणी व चाराटंचाई भासू लागल्याने उन्हाळ्यात चाºयाचा व पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गुरांचा चाऱ्यासाठी शेतकरी चिंताग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 5:23 PM
औंदाणे : शेतातच आपला संसार उघडयावर थाटुन येथील परीसरातील ग्रामीण भागात मेंढपाळांना मेंढ्यांच्या चाºयासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
ठळक मुद्दे चाºयाचा व पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.