लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही गावामध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये शेततळे तयार करून पिके वाचविण्यासाठी यशस्वी प्रयोग केला होता. परंतु दोन ते तीन वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने दुष्काळात आधार देणारे शेततळे आता पोरके झाले आहे.मागेल त्याला शेततळे ही योजना शासनाने शेतकरी वर्गाला दिली होती. त्याचा लाभ तालुक्यातील ब-याच शेतकरी वर्गाने घेतला. कारण तीन वर्षे अगोदर तालुक्यातील पाण्याची स्थिती ही दुष्काळजन्य होती.शेतातील पिकांना पाणी कमी पडु नये म्हणुन शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये शेततळे तयार करण्यावर भर दिली होती. सन २०१५ ते २०१७ पर्यंत दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्ग आपल्या शेतामध्ये पिकविलेला शेती माल वाचविण्यासाठी पाणी कोठून मिळवावे या विवेचनेत पडला होता. त्यासाठी शेतकरी वर्गाने बोअरींग, धरणाच्या ठिकाणाहून पाईपलाईन, विहीर खोदणे इ.माध्यमाचा वापर केला. परंतु पावसाचे प्रमाण अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळे विहीरीनां,बोअर वेल,पाणी लागत नव्हते.मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करून ही पाणी मिळत नव्हते.जगाचा पोशिंदा शेतकरी वर्ग पाण्यासाठी जीवाचे रान करतो.पण त्याला यश मिळत नाही. याचा शासन दरबारी अहवाल गेला. याचा अभ्यास करून राज्य सरकारने ९ फेब्रुवारी २०१६ ला शेतकरी वर्गासाठी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी" मागेल त्याला शेततळे " ही योजना उपलब्ध करून दिली. या योजनेसाठी शासनाने शेतकरी वर्गाला शेततळ्यासाठी अनुदान ही सुरू केले.या फायदा तालुक्यातील जवळ जवळ ४०ते ५० टक्के शेतकरी वर्गाने लाभ घेतला. व बघता बघता तालुक्यात २६० शेततळे शेतकरी वर्गाने आपल्या पिकांच्या सरासरी नुसार आखणी केली. व पिकांना शेततळ्याच्या माध्यमातून हक्काचे पाणी उपलब्ध केले. व शेततळे पिकांसाठी एक प्रकारे जलसंजीवनी मिळाल्याने बळीराजांच्या चेहर्यावर हसु निर्माण झाले . सन २०१५ ते २०१७ हा कालखंड शेतकरी वर्गाला पाणी उपलब्ध करण्यासाठी अतिशय खडतर गेला. परंतु मागेल त्याला शेततळे ही योजना उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी वर्गाने पाणी टंचाईवर मात केली. व शेततळ्यातील उपलब्ध पाणी साठ्यामध्ये द्राक्षे, भाजीपाला, व नगदी भांडवल मिळून देणारे पिके शेतकरी वर्ग जोमाने घेऊ लागला.परंतु सध्या दोन वर्षापासून दिंडोरी तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने व विहीरी, बोअरवेल यांना पाणी मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे दुष्काळात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आधार देणारे शेततळ्याकडे बळीराजांने कानाडोळा केल्याने शेततळे आधाराविना पोरके झाले आहे.ग्रामीण भागातील शेतकरी वर्गासाठी शेततळे हे एक प्रकारे जलसंजीवनी देणारे ठरले आहे. परंतु सध्या पावसाचे प्रमाण मुबलक झाल्याने शेतकरी वर्गाचा शेततळ्याकडे कानाडोळा निर्माण झाला असला तरी भाविष्यात त्याचा कधी ना कधी उपयोग होणार आहे. त्यासाठी आम्ही शेततळ्याची विशेष काळजी घेत आहे. कारण दुष्काळ जन्य स्थिती त आमच्या पिकांना शेततळ्यानीच आधार दिला आहे- रामनाथ संतू पिंगळे, शेतकरी, अंबे जानोरी.शेततळे ही योजना शासनाने शेतकरी वर्गाला ठरवून दिलेली एक प्रकारे जलसंजीवनी योजना आहे. जरी यंदा पावसाचे प्रमाण मुबलक असले तरी शेतकरी वर्गाने पुढील हंगामासाठीचा वातावरणातील बदलावा कसा असेल हे सांगणे कठीण आहे. परंतु शेतकरी वर्गाने शेततळ्याची निगा राखावी.व पाणी साठा यांची काळजी घेऊन नियोजन करावे.- अभिजीत जमधडे, दिंडोरी तालुका कृषी अधिकारी.
दुष्काळात आधार देणारे शेततळे झाले पोरके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 3:28 PM
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील काही गावामध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये शेततळे तयार करून पिके वाचविण्यासाठी यशस्वी प्रयोग केला होता. परंतु दोन ते तीन वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने दुष्काळात आधार देणारे शेततळे आता पोरके झाले आहे.
ठळक मुद्देपावसाचे प्रमाण वाढल्याने बळीराजांचा शेततळ्याकडे कानाडोळा