सटाणा : तालुक्यातील बहुतांश नागरिकांना शिधापत्रिकेवर धान्य मिळत नसल्याने तसेच शासनाच्या विविध योजनांपासून दीड वर्षापासून वंचित राहात असलेल्या लाभार्थींना लाभ मिळावा या मागणीसाठी महाराणा प्रताप क्र ांती दलाचे तालुका उपाध्यक्ष लखन पवार यांनी सोमवारपासून (दि.२६) येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. याबाबत अनेकवेळा प्रांताधिकारी व तहसी-लदारांना निवेदने सादर केली; मात्र आश्वासनांपलीकडे काही मिळाले नाही. संबंधित अधिकारी मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या बेमुदत उपोषणात पवार यांच्यासह विनायक सोनवणे, प्रभाकर पवार, भाऊसिंग पवार, अरुण मोहन, प्रशांत मोहन, त्र्यंबक गांगुर्डे, अनिल रौंदळ, ज्ञानेश्वर गोसावी, विलास चव्हाण, अनिल पवार, साहेबराव रौंदळ, विजय रौंदळ, व्यंकोजी रौंदळ, सतीश रौंदळ, दीपक ठोके, देवबा मोहन, बाबुलाल मोहन, संजय मोहन, भाऊसाहेब जगताप, योगेश पवार, दत्तू पवार यांचा समावेश आहे. विलास बच्छाव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. दरम्यान अन्नसुरक्षा योजना लागू झाल्यापासून कोणत्याही नवीन शिधापत्रिकाधारकाला शासनाकडून धान्य देण्याचे निर्देश नसल्याचे पुरवठा निरीक्षक एस. जी. भामरे यांनी स्पष्ट केले.आॅनलाइन नोंदणीच्या बहाण्याने उडवाउडवाची उत्तरेबागलाण तालुक्यातील बहुतांश निराधार महिला, वृद्ध, अपंग आहेत. संजय गांधी योजनेचा लाभ मिळावा म्हणून दीड वर्षापासून लाभार्थी हेलपाटे मारत आहेत; मात्र संबंधित विभागाचे अधिकारी आॅनलाइन नोंदणीच्या बहाण्याने उडवाउडवाची उत्तरे देत आहेत. बहुतांश नागरिकांना शिधापत्रिकेवर धान्यही मिळत नाही.
धान्याच्या मागणीसाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:21 AM