शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

कॅप्टनच्या वृद्ध पत्नीचे बॅँकेसमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:36 AM

पेन्शनची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्टेट बँकेच्या विरोधात सैन्यदलातील कॅप्टनच्या वृद्ध पत्नीने मुलासह बँकेच्या सातपूर येथील मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

सातपूर : पेन्शनची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या स्टेट बँकेच्या विरोधात सैन्यदलातील कॅप्टनच्या वृद्ध पत्नीने मुलासह बँकेच्या सातपूर येथील मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.  कॅप्टन मनोहर कापडणीस हे सैन्यदलातून १९९६ साली सेवानिवृत्त झाले आणि २००५ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सैन्यदलाकडून देण्यात येणारी पेन्शन त्यांची पत्नी मंडोधरा कापडणीस यांना देण्याची पेमेंट पेन्शन आॅर्डर सटाणा येथील स्टेट बँकेला देण्यात आली होती.  मात्र आदेशानुसार नियमानुसार पेन्शन दिली गेली नाही. नियमानुसार १५ हजार ४६५ रुपये पेन्शन असताना बँकेकडून ३ हजार ३३६ रुपये पेन्शन देण्यात येत होती. मंडोधरा कापडणीस यांनी तक्रार केल्यानंतर बँकेने चूक मान्य करीत २०१२ मध्ये बँकेने ६ लाख ३६ हजार ७२३ रुपये फरक म्हणून टप्प्याटप्प्याने २०१७ पर्यंत दिला. फरकाची रक्कम ११ लाख २६ हजार ७६४ असल्याचे कापडणीस यांचे म्हणणे आहे. त्यानंतर जास्त पैसे दिले गेलेत  म्हणून बँकेने कापडणीस यांच्या पेन्शनमधून ८ हजार ४०० रुपयांची दरमहा कपात करण्यास सुरुवात केली.  सैन्यदलातील अधिकाºयाच्या मृत्यूनंतर पत्नीला अशाप्रकारे संघर्ष करावा लागत असल्याची प्रतिक्रिया मंडोधरा कापडणीस यांनी व्यक्त केली आहे. तर ही न्यायालयीन बाब असून न्यायालयाकडून कागपत्रे घ्यावीत, असे बँकेच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.  कापडणीस यांनी पुन्हा तक्रार केल्यानंतर कपात केलेली रक्कम बँकेने पुन्हा परत केली. बँकेच्या या घोळामुळे पेन्शनची तफावतीची कागदपत्रे बँकेकडे मागितली असता बँकेने देण्यास टाळाटाळ केली आहे. ही कागदपत्रे मिळावीत म्हणून मंडोधरा कापडणीस आणि त्यांचा मुलगा विजय कापडणीस हे दोघे मायलेक बँकेच्या सातपूर येथील मुख्यालयासमोर सोमवारपासून उपोषण बसले आहे.

टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बॅक ऑफ इंडियाNashikनाशिक