नाशिक : आरोग्यवर्धिनी वैद्यकीय अधिकारी पुनर्नियुक्ती व वेतनास विलंब होत असून, यासंबंधी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद लाभत नसल्याची तक्रार करतानाच प्रशासनाविरोधात सोमवारी (दि.८) उपोषण करण्याचा इशारा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती यतिंद्र पगार यांनी गुरुवारी (दि. ४) जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.नाशिक जिल्ह्णातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त असून, सध्या कंत्राटी पद्धतीने नियुक्त वैद्यकीय अधिकाºयांच्या भरवशावर जिल्ह्णात रुग्णसेवा सुरू आहे. जिल्ह्णात स्वाइन फ्लू, चिकनगुन्या, डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांचा फैलाव होत असताना आरोग्यवर्धिनी कंत्राटी वैद्यकीय ११ महिन्यांसाठी पुनर्नियुक्ती व वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे.वैद्यकीय आदीकाºयांचा प्रश्न प्राधान्याने सोडविणे आवश्यक असताना त्यांची फाइल गेल्या महिनाभरापासून प्रलंबित आहे. जनतेच्या आरोग्यासंदर्भात असा दिरंगाईचा खेळ करणाºया जबाबदार अधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सभापती यतिंद्र पगार यांच्यासह डॉ. भारती पवार, सिद्धार्थ वनारसे, अशोक टोंगारे, बाळासाहेब क्षीरसागर आदी उपस्थित होते.वेतनाला होतो विलंबराज्य शासानाने हेल्थ वेलनेस सेंटर आरोग्यवर्धिनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला स्थानिक अथवा जवळच्या उपकेंद्रांवर वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी ही योजना अमलात आणली आहे. परंतु, जिल्हा परिषद प्रशासनाने ही योजना गांभीर्याने घेतलेली नसून जिल्हा परिषदेच्या आरोग्यवर्धिनी वैद्यकीय अधिकारी पुनर्नियुक्ती व वेतनाबाबत मोठ्या प्रमाणावर विलंब होतो आहे.
आरोग्यवर्धिनी अधिकाऱ्यांच्या प्रश्नांसाठी उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:41 AM
नाशिक : आरोग्यवर्धिनी वैद्यकीय अधिकारी पुनर्नियुक्ती व वेतनास विलंब होत असून, यासंबंधी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद लाभत नसल्याची तक्रार करतानाच प्रशासनाविरोधात सोमवारी (दि.८) उपोषण करण्याचा इशारा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समिती सभापती यतिंद्र पगार यांनी गुरुवारी (दि. ४) जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
ठळक मुद्दे वेतनाबाबत मोठ्या प्रमाणावर विलंब होतो आहे.