सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील बंद अवस्थेतील कंपन्यांबाबत योग्य तोडगा काढून त्या सुरू करण्यात याव्यात आणि त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांना सामावून घ्यावे यासाठी प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने उपोषण करण्यात आले.अंबड औद्योगिक वसाहतीत ज्या उद्देशासाठी येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी घेण्यात आल्या तो उद्देशच सफल होत नाही. या मोकळ्या भूखंडावर नवीन उद्योग उभारावे व यात स्थानिकांना सामावून घ्यावे या मागणीसाठी संघर्ष समितीचे प्रवक्तेसाहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली अंबड येथील वेअरहाउस येथे प्रकल्पग्रस्तांनी उपोषण केले. शासनाने कबूल केल्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली नाहीच शिवाय भुखंड देखील देण्यात आलेले नाही. असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. एकतर बंद उद्योग सुरू करावेत, त्यात प्रकल्पग्रस्तांना सामावून घ्यावे अशी मागणी करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांनी एम. आय. डी. सी.च्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनीही बंद कंपन्यांबाबतचा सर्व्हे करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यानंतर सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषणात साहेबराव दातीर यांच्यासह बाजीराव दातीर, शांताराम फडोळ, हिरामन दातीर, गोविंद पोटे, धनाजी लगड, सुनील दातीर, नितीन दातीर आदिंनी सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)
प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे उपोषण
By admin | Published: March 09, 2016 11:05 PM