शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

सिन्नर येथे ठेवी परत मिळण्यासाठी उपोषण

By admin | Published: August 21, 2016 12:27 AM

सिन्नर येथे ठेवी परत मिळण्यासाठी उपोषण

सिन्नर : येथील सिन्नर व्यापारी बॅँक, सिन्नर नागरी पतसंस्था, भैरवनाथ नागरी पतसंस्था, रायसोनी पतसंस्था या अडचणीत आलेल्या बॅँकांमध्ये अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी निबंधक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शनिवारी सकाळपासून शिंदे यांनी उपोषणास प्रारंभ केल्यानंतर विविध संघटना व ठेवीदारांनी शिंदे यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. शासनाने बॅँकांच्या मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे मिळवून देण्याची मागणी शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब हांडे, भाऊसाहेब शिंदे, माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, माजी नगरसेवक किरण लोणारे, मुद्रांक विक्रते संघटनेचे बाळासाहेब देशपांडे, गोपाळ गायकर, एकनाथ दिघे आदिंसह ठेवीदार व कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शिंदे यांना पाठिंबा दिला. (वार्ताहर)