लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत औंदाणे ग्रामपंचायतीने बांधलेल्या व्यापारी गाळ्यांचे बोगस लाभार्थी दाखवून वाटप केल्याप्रकरणी तत्काळ चौकशी करावी या मागणीसाठीे माहिती अधिकार कार्यकर्ता तुषार खैरनार यांनी सोमवारी येथील पंचायत समिती कार्यालयसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. दरम्यान, सहाय्यक गटविकास अधिकारी महेंद्र कोर यांनी पंधरा दिवसांच्या आत करवाईचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले.शहरालगतच असलेल्या औंदाणे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या यशवंतनगर येथे जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत सन २०१०-११ मध्ये व्यापारी गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. गाळेवाटप करताना लाभार्थींची निवड ही बांधकामाचा प्रस्ताव विचाराधीन असतानाच झाले असते. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने गाळेवाटप करताना जे कारणे कागदोपत्री दाखविली आहेत. त्यापैकी कोणताही लाभार्थी या गाळ्यांमध्ये स्वत: व्यवसाय न करता दुसऱ्या व्यावसायिकांना जादा भाडे आकारून भाड्याने दिले आहेत. ग्रामपंचायतीला मात्र नाममात्र भाडे दिले जाते. औंदाणे येथील तत्कालीन सरपंच कैलास निकम, ग्रामसेवक नारायण पवार यांच्या काळातील हा प्रकार आहे. जिल्हा ग्रामीण विकास योजनेंतर्गत यशवंतनगर येथे गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. या योजनेचा प्रस्ताव सादर करतानाच काहीजणांना वैयक्तिक व्यवसाया-साठी व अम्मा भगवान महिला बचतगट, यशवंत महिला बचतगट, सप्तशृंगी महिला बचतगट यांना कागदोपत्री गाळे वितरित करण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात या लाभार्थींनी जादा भाडे पट्ट्याने दुसऱ्या व्यावसायिकांना गाळे दिले आहेत. यामुळे ग्रामपंचायतीचे नुकसान होत असून, गटविकास अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच नव्याने गाळे वाटप करून ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करावी या मागणीसाठी खैरनार यांनी उपोषण सुरू केले होते.तालुक्यातील औंदाणे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या यशवंतनगर येथील गाळेवाटप गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी तुषार खैरनार यांनी सुरू केलेल्या उपोषणाची बागलाणचे सहाय्यक गटविकास अधिकारी महेंद्र कोर यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोर यांनी सायंकाळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.
गैरव्यवहार चौकशीसाठी सटाणा येथे उपोषण
By admin | Published: July 10, 2017 11:38 PM