सिडको : प्लॅस्टिक, घाण व कचºयाने भरलेल्या नासर्डी नदीच्या (नंदिनी) झालेल्या बकाल स्वरूपाला महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोप करीत पश्चिम प्रभाग सभापती हेमलता पाटील यांनी आज उंटवाडी येथील म्हसोबा मंदिर येथे उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मनपाकडून याबाबत लेखी आश्वासन दिले जाणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही पाटील यांनी केला आहे. नंदिनीच्या काठालगत असलेल्या सिटी सेंटर मॉलपासून ते मुंबईनाकापर्यंत दाट लोकवस्ती आहे. तसेच मिलिंदनगरसारखा स्लम भाग हा या नदीच्या काठावर असून, नाल्यामध्ये टाकण्यात येत असलेल्या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा टाकला जात असून, त्यामध्ये घाण, वाळू तसेच खराब झालेल्या टाकावू वस्तूदेखील टाकण्यात येतात. याबरोबरच नाल्यामध्ये काही कंपन्यांनी रसायनमिश्रित पाणीदेखील या नंदिनीत सोडल्याने नदीला नदी म्हणायची की गटारगंगा, असा प्रश्नही सभापती हेमलता पाटील यांनी उपस्थित केला आहे. नदीच्या स्वच्छतेबाबात वारंवार प्रभाग सभेत लक्षवेधी सूचना मांडल्यानंतरही वरवर फवारणी करण्यापलीकडे काहीच केले जात नाही. या उपोषणात कॉँग्रेसच्या सिडको ब्लॉक अध्यक्ष मीरा साबळे, कॉँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शैलेश कुटे, विधानसभा युवक अध्यक्ष संतोष ठाकूर, युथ कॉँग्रेसचे माजी पदाधिकारी भरत पाटील, नगरसेवक समीर कांबळे, आशा तडवी, उद्धव पवार, दिनकर तिडके, राजकुमार जैन, चंदू पाटील, महेंद्र पाटील, सोपान कडलग आदी सहभागी झाले होते. नासर्डी नदीच्या सुधारणा करण्याबात मनपाकडून जोपर्यंत लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सभापती हेमलता पाटील यांनी सांगितले. दरम्यान, मनपा अधिकारी दोरपूरकर, आडेसरा, वंजारी आदी अधिकाºयांनी उपोषणस्थळी भेट दिली.
‘नासर्डी’ वाचविण्यासाठी उपोषण हेमलता पाटील : प्रदूषण हटविण्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 1:43 AM
सिडको : प्लॅस्टिक, घाण व कचºयाने भरलेल्या नासर्डी नदीच्या (नंदिनी) झालेल्या बकाल स्वरूपाला महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोप करीत पश्चिम प्रभाग सभापती हेमलता पाटील यांनी आज उंटवाडी येथील म्हसोबा मंदिर येथे उपोषण सुरू केले आहे.
ठळक मुद्दे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारवरवर फवारणी