असे वाढले दर (प्रति किलो)
श्रावणाआधी आता
साबुदाणा - ६० ६५
शेंगदाणे - ११० १२०
चाैकट-
आवक घटली, मागणी वाढली
साबुदाणा - शहरातील व्यापाऱ्यांकडे साबुदाण्याचा पुरेसा साठा असला तरी सध्या सुरु असलेले उपवास, सण उत्सव यामुळे मागणी वाढली असल्याने साबुदाण्याच्या दरात पाच ते सहा रुपयांची वाढ झाली आहे. साबुदाण्याची कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.
शेंगदाणा - यावर्षी शेंगदाण्याच्या उत्पादनात काहीशी घसरण झाल्याने त्याचा बाजारातील पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. उपवासाच्या काळात शेंगदाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने शेंगदाण्याचे दर वाढले आहेत. श्रावणापूर्वी १०० ते ११० रुपये किलोपर्यंत शेंगदाणा होता. आता प्रतिनुसार १०५ ते १२० रुपये किलो यादरम्यान शेंगदाण्याची विक्री होत आहे.
चौकट-
भगरही महागली
उपवासाच्या काळात अनेक नागरिकांची भगरीला पसंती असते. यामुळे भगरीला मागणी चांगली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात तफावत निर्माण झाली असून मिल मालकांनीच दरवाढ केल्याने किरकोळ बाजारात भगरीच्या दरात किलोमागे तब्बल ३० रुपयांनी वाढ झाली आहे.
चौकट-
मागणी दुप्पट वाढली
कोट-
उपवासामुळे सध्या शेंगदाणा, साबुदाणा, भगर यांना मागणी वाढली आहे. यावर्षी शेंगदाण्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. साबुदाण्याचा पुरवठा सुरळीत असला तरी त्याची मागणी वाढली आहे. भगरीच्या उत्पादनावरही काहीसा परिणाम झाला आहे. भगरीला मागणी मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे या पदार्थांचे दर वाढले आहेत. - शेखर दशपुते, किराणा व्यापारी