अझहर शेख
नाशिक - नाशिक पुणे महामार्गावरील नाशिक रोडपासून तीन किमी अंतरावर भीषण अपघाताची Nashik ST Accident घटना घडली. येतील शिंदे पळसे गावाच्या हद्दीत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसचे ब्रेक फेल झाल्याने बसने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. या अपघातात एकूण २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक दृष्ट्या समोर येत आहे. आज दुपारी १२.३० वाजता ही दुर्घघटना घडली असून नाशिक शहरापासून केवळ ६ ते ७ किमी अंतरावरील हा अपघात आहे.
अपघातानंतर घटनास्थळावरच बसला भीषण आग लागली. त्यामध्ये बस संपूर्ण जळून राग झाली बसमधील काही प्रवाशांचा होरफळून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेनंतर अपघातस्थळी अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका दाखल झाली असून आठ ते दहा लोकांना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारसाठी करण्यात आले आहे. जखमींवर बिटको हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक येथे दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून बघ्यांचीही गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.
बस अपघातात जखमी झालेल्या राजगुरू नगर-नाशिक बस मधील प्रवाशांची नावे खालीलप्रमाणे
हर्षदा मंगेस पोंदे, संगमनेररुपाली सचिन दिवटे, अकोलेसमृद्धी सचिन दिवटेसईदा इनामदार, संगमनेरमुस्तफा शेख, संगमनेरनसमा जहाँगिरदार, संगमनेरऔवेस अहमद, धारावी मुंबईसिताराम देवराम कुरणे, सिकर
या सर्व प्रवाशांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.