निफाड : कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या मुलाच्या वडिलांचे पुत्रवियोगाने हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.निफाड येथील विठ्ठल लहानू जाधव या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून दि. १० नोव्हेंबर रोजी विषारी औषध सेवन केल्याने उपचार सुरू असताना त्यांचा दि. २५ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. पुत्र विठ्ठल जाधव यांच्या निधनाने त्यांचे वडील लहानू जाधव दु:खी झाले होते. गुरु वारी (दि.६) रात्री साडेअकराच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने लहानू जाधव (५५) यांचेही निधन झाले. अवघ्या १२ दिवसांत जाधव कुटुंबातील कर्ते पुरु ष असलेल्या वडील आणि मुलाचे निधन झाल्याने जाधव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या १३ व्याच्या दिवशी शुक्र वारी सकाळी निफाड येथे लहानू जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत लहानू जाधव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन सुना, दोन विवाहित मुली, नातू असा परिवार आहे.
आत्महत्या केलेल्या पुत्राच्या वियोगाने पित्याचेही निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 12:38 AM
कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या मुलाच्या वडिलांचे पुत्रवियोगाने हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ठळक मुद्देमुलाच्या तेराव्याच्या दिवशी वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ