शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

बिल्व तीर्थात पिता-पुत्र बुडाले

By admin | Published: July 10, 2017 1:02 AM

त्र्यंबकेश्वर : उताराने टर्न न बसल्याने गाडी थेट पाण्यात पडून सुरेश भिकाजी भांगरे व सूरज सुरेश भांगरे यांचा बुडून मृत्यू झाला,

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : नव्याने वाहन खरेदी केल्याने त्या आनंदात गावात सहज चक्कर मारण्यासाठी गेले असताना नीलपर्वत आखाड्यामागील रस्त्याने येत असताना उताराने टर्न न बसल्याने गाडी थेट पाण्यात पडून येथील सुरेश भिकाजी भांगरे (५४) व सूरज सुरेश भांगरे (२२) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर वाहन चालविण्यास बसलेला मोठा मुलगा विशाल सुरेश भांगरे प्रसंगावधान राखून पाण्यातच बाहेर पडून पोहत पोहत बाहेर आला.सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला. सुरेश भांगरे यांचा माहेश्वरी धर्मशाळेसमोर छोट्या हॉटेलचा व्यवसाय असुन त्यांनी नुकतीच अल्टो क्र . एमएच०४ डीबी ५१४१ ही ‘सेकंडहॅन्ड’कार खरेदी केली होती. आज गुरु पौर्णिमा निमित्ताने ते खंडेराव मंदीर, कासारबारी मार्गे सिंहस्थात तयार केलेल्या नवीन रस्त्याने जात होते. त्या रस्त्यावरील उतार वळण घेऊन डावीकडे वळविण्यात येतो. वेळीच टर्न बसला नाही तर गाडी थेट पाण्यात पडण्याची भिती असते. आणि नेमके तसेच घडले. अल्टो कारला वेळीच वळण घेता न आल्याने ती थेट पाण्यात गेली. त्यात तीनही बापलेक बसलेले होते. यातील दोघे मयत झाले तर एकाच जीव वाचला. दरम्यान वाहन काढण्यासाठी त्र्यंबक नगरपालिकेचे कर्मचारी पोलीस काही सेवाभावी कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेऊन कार पाण्याबाहेर काढली. तत्पूर्वी दोन्ही मृत देह कार पाण्यातच असतांना बाहेर काढले पण तरीही उशीर झाल्याने येथील उप जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याणी वासनिक यांनी तपासून जागीच मृत्यु झाल्याचे सांगीतले.