नाशिक : पित्याने दीड एकर शेती प्रेयसीच्या नावावर केल्याने त्यास मुलाने विरोध केल्याने पित्याने २८ वर्षीय तरुण मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नाशिक-पुणेरोडवरील वैद्यनगर येथे घडली. याप्रकरणी संशयित पशुवैद्यकीय अधिकारी प्रभाकर माळवाड यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जनरल वैद्यनगर परिसरात राहणारे देवळा पशुसंवर्धन दवाखान्यातील पशुवैद्यक संशयित प्रभाकर माळवाड व त्यांचा मुलगा निलेश माळवाड आणि फिर्यादी आई जयश्री यांनी रविवारी (दि.३) रात्री सोबत जेवण केले. यावेळी मुलगा निलेश याने वडिलांना ‘पोल्ट्री फार्म सुरू करून द्या’ असे सांगितले. यावेळी त्यांच्यात वाद होऊन हमरी-तुमरी झाली. ‘तू काही कामाचा नाही, त्यामुळे मी तुला काहीही देणार नाही, असे म्हटल्याने वाद विकोपाला गेला.मयत नीलेश यांच्या आईने मध्यस्थी करीत भांडण मिटविले. माळवाड दाम्पत्य त्यांच्या खोलीत झोपले व मुलगा निलेश हा त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला असताना सोमवारी पहाटेच्या सुमारास निलेश याचा ओरडण्याचा आवाज कानी आल्याने त्याची आई मदतीला धावली. यावेळी प्रभाकर यास त्यांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी पत्नीला ढकलून देत निलेश (२८) यास गळा दाबून ठार केले, असे फिर्याद त्यांनी पोलिसांत दिली.याप्रकरणी पोलिसांनी संशयित प्रभाकर यास अटक केली असून जयश्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याविरुद्ध खुुनाचा गुन्हा दाखल केला आहे.सलग दोन घटनांनी शहर सुन्नजन्मदात्या पित्याने ‘आज तुला संपवूनच टाकतो’ असे म्हणत मुलगा साखरझोपेत असताना त्याच्या छातीवर बसून गळा आवळून ठार केल्याच्या घटनेने पित्याच्या नात्याला काळिमा फासला गेला. काही दिवसांपूर्वीच आईने आपल्या प्रियकराच्या मदतीने एका चिमुकल्याचा काटा काढल्याची घटना शहरात उघडकीस आली होती. या दोन्ही घटना शहरात लागोपाठ घडल्याने आई-वडिलांच्या नात्याची प्रतिमाही जनमानसात मलीन झाली आहे.
घरगुती वादातून बापाने आवळला मुलाचा गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 12:42 AM
पित्याने दीड एकर शेती प्रेयसीच्या नावावर केल्याने त्यास मुलाने विरोध केल्याने पित्याने २८ वर्षीय तरुण मुलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना नाशिक-पुणेरोडवरील वैद्यनगर येथे घडली. याप्रकरणी संशयित पशुवैद्यकीय अधिकारी प्रभाकर माळवाड यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
ठळक मुद्देवैद्यनगर येथील घटना : आईने घेतली पोलिसांकडे धावसंशयित पित्याला ठोकल्या बेड्या