--इन्फो--
दोन महिन्यांपूर्वी पत्नीची आत्महत्या
दहावा मैल परिसरात शंकरच्या पत्नी लक्ष्मी महाजन यांनी अज्ञात कारणातून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यांच्या आत्महत्येमागील निश्चित कारण अद्यापही समोर आलेले नाही, याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली होती. या घटनेनंतर शंकर यांची मुले काही दिवस आजीच्या घरी होती तसेच शंकरदेखील जवळच्या घरात राहत होते.
--कोट--
सूनबाई मयत झाल्यानंतर शंकर काही दिवसांनी गावी आला हाेता. यावेळी नातवांसोबत आमची भेट झाली, तेव्हा शंकर चांगला बोलला त्याचे कोणासोबत भांडणही नव्हते आणि पैशांचीदेखील त्याने काही अडचण सांगितली नव्हती, मात्र हे असे अचानक कसे घडले हेच समजत नाही. मी सोन्यासारखा मुलगा आणि नातवांना कायमचे गमावले.
-गुलाब महाजन, शंकरचे वडील
080921\08nsk_38_08092021_13.jpg~080921\08nsk_39_08092021_13.jpg~080921\08nsk_40_08092021_13.jpg
खदाणमयत शंकरत्याची दोन मुले~खदाणमयत शंकरत्याची दोन मुले~खदाणमयत शंकरत्याची दोन मुले