नाशिक : ज्या मुलीला पित्याने जन्म दिला त्या अल्पवयीन मुलीवर वक्रदृष्टी करत पित्याने तिच्यासोबल लैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार मुलीच्या आईमुळे उघडकीस आला आहे. आईने संशयित पतीविरुद्ध तक्रार दिली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी संशयित रामदासविरुद्ध विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पेठरोडवर विठाईनगर भागात रामदास हा पत्नी, मुलगी, मुलासोबत राहतो. सोमवारी (दि.२७) रात्री घरात सगळे झोपलेले असताना रामदासने त्याच्या अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे करत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे तक्रारीत पिडितेच्या आईने म्हटले आहे. आईने पती रामदास याचा या प्रकरणी जाब विचारला असता त्याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी पीडित मुलीसह आई व मुलाला मारहाण केली तसेच या प्रकरणाची वाच्यता केल्यास ‘तुम्हाला सगळ्यांना जिवे ठार मारून टाकेल’ अशी धमकीसुध्दा दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास म्हसरूळ पोलीस करत आहे.
ज्या बापाने मुलीला जन्म दिला त्यानेच तीच्या ‘अब्रु’ला टाकले धोक्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 15:59 IST
अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे करत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे तक्रारीत पिडितेच्या आईने म्हटले आहे.
ज्या बापाने मुलीला जन्म दिला त्यानेच तीच्या ‘अब्रु’ला टाकले धोक्यात !
ठळक मुद्देविनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल