वाडीवºहे : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील विवाहिता माधुरी विकास शिरसाट (२५) हिचा शारीरिक,मानसिक छळ करून तीला मारून त्यांच्याच विहीरीत फेकले असल्यामुळे तिचा मृत्यु झाला असुन याबाबत दोषींंवर कडक कारवाई करावी अशी तक्र ार विवाहितेचे वडील पंढरीनाथ केरु भोर रा. जानोरी (ता.इगतपुरी) यांनी सोमवारी(दि.३१)नाशिकच्या ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ आरती सिंग यांचेकडे दाखल केली आहे.आपल्या मुलीच्या मृत्युस कारणीभूत सासरे नामदेव गंगाधर शिरसाट, पती विकास शिरसाट, सासु गयाबाई शिरसाट व दिर किरण यांस कडक शासन व्हावे अशी मागणी भोर यांनी निवेदनात केली आहे.जानोरी येथील पंढरीनाथ भोर यांची मुलगी माधुरी हिचा विवाह १२ मार्च २०१८ रोजी मुसळगाव येथील नामदेव शिरसाट याचा मुलगा विकास बरोबर झाला होता. तेव्हा पासून सासरचे लोक माधुरीला वडिलांकडून पाईप लाईन व ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी करत होते. सुरु वातीला ४० हजार रु पये रोख दिले. त्यानंतर माधुरीला मुलगा झाला. तरीही माधुरीला त्रास व पैशांचा तगादा सुरु च होता.दरम्यान शुक्र वारी (दि २८) सायंकाळी भोर यांना फोन करून माधुरी जानोरीला आली का? ती गायब आहे असे सासरे नामदेव शिरसाठ यांनी सांगितले. तत्काळ तिथे मुसळगावला गेल्यावर कुणीच काहीही न सांगता काही वेळेत लगेचच एक पोलिस गाडी, अॅम्बुलंस आणि पाण्यात उतरण्यासाठी दोर व इतर साहित्य घेवून एक पथक आले. या पार्श्वभूमीवर माझ्या मुलीचा घातपात झाल्याचासंशय आहे. पोलिस माझे म्हणणे एकूण घेतले जात नसल्याचा आरोप भोर यांनी डॉ. आरती सिंग यांना दिलेल्या पत्रात केला आहे. या प्रकरणी एम आय डी सी पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतचा गुन्हा दाखल केला असुन चौघाना ताब्यात घेण्यात आले आहे.कोट:दिलेल्या तक्र ारीची योग्य आणि सखोल चौकशी केली जाईल. कायदा कुणालाही सोडत नाही. तत्काळ तिथल्या परिस्थितिबाबत माहिती घेवू. आणि पुढची कडक कारवाई करू.-डॉ आरती सिंग, जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक(फोटो ३१ माधुरी)
विवाहिता आत्महत्या प्रकरणी वडीलांची तक्र ार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 4:36 PM
वाडीवºहे : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील विवाहिता माधुरी विकास शिरसाट (२५) हिचा शारीरिक,मानसिक छळ करून तीला मारून त्यांच्याच विहीरीत ...
ठळक मुद्देसासरच्यांनी मुलीचा घातपात करून विहिरित फेकल्याचा आरोप