निफाड : अवघे साडेतीन महिन्यापूर्वी विवाह झालेल्या निफाड तालुक्यातील खेडे येथील देविदास नामदेव पगार यांची कन्या हर्षदा हिचा तिच्या सासरच्यांनी प्लॅट घेण्यासाठी ५ लाख रु पये आणावे यासाठी खून केला असून तिच्या सासरच्या लोकांवर कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन मयत हर्षदाच्या वडीलांनी निफाडचे प्रांत डॉ शशिकांत मंगरुळे याना दिले आहे.हर्षदा हीचा विवाह जुन्नर जि पुणे येथील मंगेश वसंत क्षीरसागर यांचेसोबत ३१ मार्च २०१६ रोजी खेडे ता निफाड येथे थाटामाटात लावुन दिला होता. विवाहानंतर तिच्याकडे माहेरु न फ्लँट घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी तगादा सुरु झाला होता, मात्र हर्षदाने माहेरची परिस्थिति हलाखीची असल्याचे सांगितले होते. सासरच्यांनी तिला नुकतेच माहेरी पाठवत रक्कमेची मागणी केली होती. खेडे येथील माहेरील व्यक्तींनी तिची समजुत घालत शुक्र वार दि ८ जुलै २०१६ रोजी दिर मकरंद वसंत क्षीरसागर याचेबरोबर पुणे येथे पाठविले होते. सासरी होणाऱ्या पैशांच्या मागणीची व छळाची माहिती माहेरी आईला फोनद्वारे देत होती यादरम्यानच १४ जुलै रोजी रात्री १०.३० वा हर्षदाच्या वडीलांना सांगवी जि पुणे पोलिसांनी फोनद्वारे मुलीने आत्महत्या केल्याची माहिती दिली . त्यानंतर वडील देविदास व नातेवाईक शुक्र वार दि १५ जुलै रोजी पुणे येथे पोहचले हर्षदाच्या शरीरावर झटापटीच्या व हात बांधल्याच्या खुणा आढळल्या त्याबाबत त्वरीत सांगवी पोलिस ठाण्यात देविदास पगार यांनी पति मंगेश वसंत क्षीरसागर, सासरा वसंत पांडुरंग क्षीरसागर, सासु अलका वसंत क्षीरसागर, दिर मकरंद वसंत क्षीरसागर यांच्या विरुध्द तक्रार नोंदविली. उत्तरीय तपासणीनंतर हर्षदाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला शुक्र वारी दि १६ जुलै रात्री उशिरा हर्षदाच्या मृतदेहावर खेडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. निवेदन देते वेळी दौलत पगार, देविदास पगार,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते, खेडेचे सरपंच निर्मला अिहरे,उपसरपंच सतिष कोल्हे, सुनिल जेऊघाले, प्रवीण जेऊघाले, संजय गायकवाड आदींसह ग्रामस्थांनी केली आहे . (वार्ताहर)
पाच लाखांसाठी मुलीचा खून केल्याची पित्याची तक्रार
By admin | Published: July 17, 2016 1:32 AM