शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

संरक्षण खात्याच्या फतव्याचा हजारोंना फटका

By admin | Published: March 19, 2017 11:57 PM

नवा आदेश : शंभर मीटर परिघात बांधकामांना मनाई

नाशिक : शहर विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींचा समस्त शहरवासीयांना वेगवेगळ्या कारणांनी त्रास होत असतानाच शहरात लष्करी हद्दीच्या परिसरातील बांधकामांना आता मनाई करण्यात आली असून, त्यामुळे परिसरातील हजारो कुटुंबीयांना त्याचा फटका बसणार आहे. त्याच्या विरोधात आता नागरिक संघटित होत असून, येत्या शनिवारी (दि.२५) नाशिकरोड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.नाशिक महापालिकेच्या नव्याने मंजूर बांधकाम नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत लष्करी हद्दीपासूनच्या एअर फनेलचा पुरेसा उल्लेख नाही. त्यातच आता संरक्षण खात्याने बांधकाम निर्बंधांबाबत नवा आदेश काढला आहे. त्यानुसार शहरातील लष्करी हद्दीपासूनच्या शंभर मीटर परिघात कोणत्याही प्रकारच्या बांधकामांना परवानगी असणार नाही. तसेच शंभर मीटरपासून ते पाचशे मीटर क्षेत्रापर्यंत केवळ पंधरा मीटर उंचीच्या इमारतींना परवानगी असणार आहे. म्हणजेच केवळ तीनमजली इमारती बांधता येतील, त्यासाठीही लष्करी अधिकाऱ्यांचा ना हरकत दाखला लागणार आहे. या निर्णयामुळे परिसरातील चाळीस हजार कुटुंबांचा प्रश्न निर्माण होणार आहे. एक कोटी चौरस मीटर क्षेत्रातील मिळकतींमुळे बांधकामे विस्थापित होणार आहेत. या गंभीर प्रकाराबद्दल नाशिकरोड परिसरातील नागरिक संघटित झाले असून, ३०० नागरिक यासंदर्भात कायदेशीर लढाईसाठी सज्ज झाले आहेत. माजी नगरसेवक अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला असून, येत्या शनिवारी (दि.२५) सकाळी दहा वाजता उपनगर येथील इच्छामणी लॉन्सवर बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. या बैठकीस संबंधित बाधित नागरिकांनी सातबारा आणि भूमी अभिलेख यांच्याकडील उतारा समवेत घेऊन बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन अ‍ॅड. सहाणे यांनी केले आहे.संरक्षण खात्याच्या निर्णयाचा परिसरातील नागरिकांना फटका बसणार आहे. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी परिसरातील तीनशे मिळकतधारकांनी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली असून, आणखी नागरिकांना यात सहभागी करून घेतले जाणार आहे.- अ‍ॅड. शिवाजी सहाणे, माजी नगरसेवक