पूर्वी या भागात पाटबंधारे खात्याचा पाट होता. महापालिकेने पंधरा वर्षांपूर्वी हा पाट बुजवून त्याठिकाणी जॉगिंग ट्रॅक तयार केला. त्यामुळे इंदिरानगर, विनय नगर साईनाथ नगर, दीपाली नगर, सुचिता नगरसह परिसरातील आबालवृद्ध सकाळ व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी या ठिकाणी येतात. मध्यंतरी जॉगिंग ट्रॅकची दयनीय अवस्था झाल्याने त्याचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव फैलावू नये म्हणून महापालिकेच्या वतीने ग्रीन जीम व उद्याने बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच सकाळी व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी बंदी आहे. तरीसुद्धा सकाळी व सायंकाळी जॉगिंग ट्रॅकवर काही नागरिक फेरफटका मारण्यासाठी गर्दी करीत असून, त्यामुळे कोरोना संसर्ग कसा कमी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चौकट===
जॉगिंग ट्रॅकवर बसविण्यात आलेल्या ग्रीन जीमवर कोणतीही खबरदारी न घेता युवक व
ज्येष्ठ नागरिक व्यायाम करीत असल्याने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ग्रीन जीमची हाताळणी अनेकांकडून केली जाते. कारण की ग्रीन जीमवर एक युवक व्यायाम करून झाला का दुसरा युवक संबंधित व्यायाम साहित्य हाताळतो. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे सॅनिटायझरचा वापर करण्यात येत नाही.