लखमापूर : ग्रामीण भागातील शेतकरी हा सध्या आप आपल्या शेतामध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग करीत आहे. औद्योगिक क्र ांतीचा बळीराजाने आपल्या शेतामध्ये वापर करण्यास सुरु वात केल्यामुळे शेतातील बैलनांगर काळ्यांच्या पडद्याआड गेला आहे.आधुनिक काळात अनेक ठिकाणी बदल पाहायला मिळत आहे. त्यामध्ये ज्या आॅफिस मध्ये 20 ते 30 कामगार काम करायचे त्याठिकाणी संगणकाने जागा घेतल्याने त्या ठिकाणी आता 4ते 5 कामगार काम करताना दिसत आहेत.आजच्या या यंञीक युगाने भरपूर ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे या युगाला यंत्रिक युग म्हणून ओळखले जाते. या युगाने आता तर असा बदल घडून आणला आहे की शेती प्रधान महाराष्ट्रातील शेतीवर आक्र मण केले आहे. पहाटेच्यावेळी ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतामधील विहिरीवर मोटाच्या साह्याने शेतीला पाणी देण्याचेकाम करायचा. परंतु आता मोटा गेल्या.त्या ठिकाणी पाण्याची मोटार काम करू लागली आहे. तेव्हापासून पोळ्याला पूजन करून बैलांला मानाच्या स्थानापासून गौण स्थान मिळायला सुरु वात झाली.बळीराजा यंत्राकडे वळाल्याने कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त काम कसे होईल. याकडे भर देऊ लागला. त्यासाठी शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये पारंपारिक वापरल्या जाणारे जे साधने होती त्यामध्ये वखर, नांगर, पांभर, बैल नांगर इ.साधने हद्दपार करून त्या ठिकाणी ट्रॅक्टर या साधनांचा वापर करून शेतामध्ये ऐटीत चालणारा बैल हद्दपार केला आहे.-------------------------काही ठिकाणी विजेचा लंपडाव सुरू असल्याने आमचा जुन्या जमान्यातील साधनेच बरी होती. कारण वीजबील, पेट्रोल, डिझेल ची गगनचुंबी किमती यामुळे बळीराजा हवालदील झाला आहे. महागई जर अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा शेतकरी वर्ग आपल्या परंपरागत साधनांकडे वळेल व पुन्हा एकदा शेतातील ऐटीत चालणारा बैलनांगर पाहायला मिळेल असे चित्र निर्माण झाले आहे.--------------------------------------------------ग्रामीण भागातील बहुतेक शेतकरी वर्गाने आपल्या गोठ्यातील बैल आता न ठेवल्याने शेतातील बैल नांगर काळ्यांच्या पडद्याआड गेला आहे. नव्या क्र ांतीने ग्रामीण भागातील प्रत्येक ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याने ग्रामीण भागातील अनेक परंपरागत रूढी, परंपरागत साधने काळाच्या पडद्याआड जाताना दिसत आहे.
ग्रामीण भागातून नांगर हद्दपार होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 9:30 PM