नाशिकरोड : देशातील सिक्युरिटी प्रिंटिंग अॅण्ड मिटिंग कॉर्पोरेशन इंडियाच्या रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट महाप्रबंधकपदी एम. सी. बैलप्पा यांची निवड करण्यात आल्याबद्दल आपला पॅनलच्या वतीने सत्कार करण्यात आला. देशातील नऊ मुद्रणालयांचे सिक्युरिटी प्रिंटिंग अॅण्ड मिटिंग कॉर्पोरेशन इंडिया नावाने २००६ साली महामंडळ स्थापन करण्यात आले होते. महामंडळाच्या स्थापनेप्रसंगी त्रिपक्षीय झालेल्या करारामध्ये देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट विभागाची स्थापना करण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार २०१५-१६ मध्ये जेलरोड करन्सी नोट प्रेसच्या प्रशासकीय इमारतीमध्ये महामंडळाचे तत्कालीन संचालक पी. एन. राडकर यांनी रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट विभागाची स्थापना केली. मात्र तेव्हापासून या विभागाचे महाप्रबंधकपद रिक्त होते. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका तृप्ती पात्रा घोष यांनी नुकतीच विविध मुद्रणालयांचे महाप्रबंधक म्हणून प्रदीर्घ अनुभव असलेल्या एम. सी. बैलप्पा यांची नियुक्ती केली. बैलप्पा यांच्या निवडीबद्दल आपला पॅनलच्या वतीने कामगार नेते रामभाऊ जगताप, अशोक गायधनी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश बोराडे, हरिभाऊ ढिकले, अरुण मानभाव, जयंत गाडेकर, हिरामण तेजाळे, शिरीष खाडे, राजू शहाणे, अनिल जाधव, राजू चव्हाण, रमेश घुमरे, सतीश निकम, राजू पवार, अशोक बर्वे, बाळकृष्ण बोरस्ते, बाळासाहेब चंद्रमोरे, दगू खोले, भाऊसाहेब लोंढे आदी उपस्थित होते.
प्रेसचे महाप्रबंधक बैलप्पा यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:09 AM